शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा स्थापना दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दारासमोर कमळाची रांगोळी आणि घरावर पक्षाचा ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपचा ४१ ...

कोल्हापूर : दारासमोर कमळाची रांगोळी आणि घरावर पक्षाचा ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपचा ४१ वा स्थापना दिवस मंगळवारी उत्साहात साजरा केला.

अंत्योदय, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय समोर ठेवत ६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची स्थापना झाली. स्थापना दिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये कोरोनाची नियमावली पाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थापना दिन साजरा करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष पाटील त्यांच्या येथील निवासस्थानी पक्षाचा ध्वज व दारामध्ये रांगोळी काढण्यात आली. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून घरावर पक्षाचा ध्वज उभा केला. कार्यकर्त्यांनी घराच्या दारावर कमळाचे स्टीकर लावले. भाजपाच्या सातही मंडलामध्ये पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी-मोर्चा अध्यक्ष व संयोजक तसेच शक्ती केंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज लावून मिठाई, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राजारामपुरी येथे भाजपा सरचिटणीस विजय जाधव व सहकाऱ्यांमार्फत एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या मुलांना व गरजू विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप करण्यात आले. ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष दिलीप बोंद्रे व रिक्षा आघाडी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ट्रक व रिक्षा यावर भाजपाचा ध्वज लावून प्रवास केला. बिंदू चौक येथील पक्ष कार्यालयाला फुलांचे तोरण बांधण्यात आले, विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्यालयात कार्यकर्त्यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

०६०४२०२१ कोल बीजेपी ०१

भाजपच्या स्थापना दिनी मंगळवारी कोल्हापूर शहर कार्यालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.