कोल्हापूर : शहराची हद्दवाढ ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक सहभागी झाले आहेत. हद्दवाढीचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ‘कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे...’, ‘हद्दवाढीचा वादा...पालकमंत्री चंद्रकांतदादा...’ अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.संदीप देसाई म्हणाले, हद्दवाढ व्हावी ही पक्षाची अधिकृत भूमिका असून, शासनदरबारी याविषयी आग्रही मागणी करण्यात आली आहे. हा विषय प्रखरतेने शासनासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.माजी अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजप सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जागरूक असून, वेळोवेळीआंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीच शहराला भरघोस मदत केलेली आहे. आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, शहराची हद्दवाढ न झाल्यास शहरातील नागरी समस्या आणखी गंभीर बनतील. सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, हद्दवाढीनंतर शहराला विविध माध्यमातून निधी मिळू शकेल. ही शहराच्या सुशोभीकरणासाठी हद्दवाढ उपयुक्त असून, सध्या ती होणे गरजेचे आहे.माजी नगरसेवक आर. डी. पाटील म्हणाले, हद्दवाढ न झाल्याने महापालिकेची सध्याची स्थिती ही बंद पडलेल्या गाडीसारखी झाली आहे. हद्दवाढ झाली नाही तर महापालिकेचे अस्तित्व धोक्यात येईल.यावेळी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकारात्मक निर्णय होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आंदोलनात राहुल चिकोडे, संतोष भिवटे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, सुभाष रामुगडे, नगरसेवक संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, उमा इंगळे, किरण नकाते, सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे यांच्यासह अॅड. संपतराव पवार, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, सुरेश जरग, अमोल पालोजी, राजू मोरे, नचिकेत भुर्केे, दिग्विजय कालेकर, सतीश पाटील-घरपणकर, हर्षद कुंभोजकर, वैशाली पसारे, रेखा वालावलकर, भारती जोशी, गणेश देसाई, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)हद्दवाढीचा निर्णय लवकर घ्याआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना दुपारी निवेदन फॅक्स करण्यात आले आहे. हद्दवाढीबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
हद्दवाढीसाठी भाजपचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 26, 2016 00:20 IST