शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST

कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला ...

कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्या आम्ही करत आहोत; पण मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या ब्रम्ह महाशिखर परिषदेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. कोल्हापुरातील गोलमेज परिषदेतही जे कोणी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विचार करतील, त्यांना मदत केली जाईल याचा पुनुरुच्चार केला होता. भाजपच्या नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली. मिलिंद संपगावकर, शेखर चरेगांवकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली. त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना बसला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. यावेळी विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी उपस्थित होते.

फडणवीस कार्यशून्य नेतृत्व..

ज्या शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवले गेले, त्याच पक्षाच्या जिवावर नेते मोठे झाले; पण त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कार्यशून्य माणसाने मागण्या जाणून घेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महानगरपालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.

नेत्यांची मग्रुरी उतरवली

भाजपच्या नेत्यांना प्रचंड मग्रुरी आली होती. जर पराभव झाला तर हिमालयात जातो असे नेते बोटांच्या चिटक्या वाजवून म्हणत होते. कसली ही मग्रुरीची भाषा. राजकारणात इतकी मग्रुरी चालत नाही हेच आम्ही दाखवून दिले, असे कुलकर्णी यांनी सांगितले.