शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा सावध पवित्रा; काँग्रेसचे दार उघडे

By admin | Updated: September 12, 2016 00:57 IST

इचलकरंजी पालिका निवडणूक : पक्ष, आघाड्यांची मोर्चेबांधणीसाठी पूर्वतयारी सुरू; घडामोडींना वेग

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी सावध पवित्रा स्वीकारला आहे. भाजपने आपली भूमिका उघड केली नसली तरी कॉँग्रेसने मात्र इच्छुकांकडून उमेदवारी मागण्याची सर्वांना संधी ‘खुली’ केली आहे. सद्य:स्थितीला राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून मोर्चेबांधणीची पूर्वतयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. येथील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पक्ष पातळीवर अधिकृतपणे लढण्याची परंपरा आहे. मात्र, कॉँग्रेसच्या विरोधात अन्य पक्षांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची पद्धत १९९० नंतर अस्तित्वात आली. २०११च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रथमच स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. त्यामुळे राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी असा तिरंगी सामना झाला. याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार निवडून आला नाही, हे एक वेगळेपण ठरले. निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले. नगरपालिकेमध्ये दोन्ही कॉँग्रेसची युती सत्तेवर अस्तित्वात आली. मागील वर्षी जानेवारी २०१५ मध्ये पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आणि त्यांच्या या बंडखोरीला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. अशा २१ महिन्यांच्या कालावधीमध्ये नगरपालिकेतील पर्यायाने शहरातील राजकीय स्थितीवर मोठे परिणाम झाले. त्याचा परिपाक म्हणून आता मॅँचेस्टर आघाडी ही नवीन आघाडी उदयास आली. तर राष्ट्रवादीतील कारंडे गटाने शाहू आघाडी नावाने नवीन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे नवीन आघाड्या स्थापन होऊन राजकीय पक्षांच्या तत्त्व व धोरणांना तिलांजली देण्यात आली आणि याचा आपोआपच राजकीय परिणाम व बदल नगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसणार आहे. अशा पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या भाजपने निवडणूक आघाडीच्या चिन्हाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू निवडणुकीमध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची जागा ‘कमळ’ चिन्हावर लढविण्यात येणार आहे. तर पालिकेमध्ये असलेल्या एकूण ६२ नगरसेवकांच्या जागांपैकी सुमारे ४० जागा ‘कमळ’ चिन्हावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तर आघाडीतील अन्य घटक पक्षांसाठी २२ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाने शनिवारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन या बैठकीत पक्षाकडे उमेदवारी मागण्यास सर्वांना संधी देण्याची घोषणा केली आहे. या उमेदवारांसाठी फक्त पक्ष मानणारा एवढी एकच अट इच्छुकांसाठी घातली आहे. असे असले तरी भाजप व राष्ट्रीय कॉँग्रेस या दोन्ही पक्षांकडून मात्र आपले संपूर्ण पत्ते स्पष्टपणे उघडलेले नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी) जांभळे विरूद्ध कारंडे काटा लढत शक्य मॅँचेस्टर आघाडीकडील पदाधिकारी व त्यांच्याकडे असणारे इच्छुक उमेदवार पाहता या निवडणुकीमध्ये ‘शविआ’ या आघाडीला दूर ठेवेल, असा राजकीय जाणकारांचा व्होरा आहे. त्याचप्रमाणे पूर्वी घोषित केल्यानुसार राष्ट्रीय कॉँग्रेस व जांभळे गट यांची युती होईल. तर ‘शविआ’ कडून कारंडे गटासाठी सात ते आठ जागा सोडल्या जातील. मात्र, याचा परिणाम म्हणून शहापूर व विक्रमनगरच्या परिसरात जांभळे गट विरूद्ध कारंडे गट अशी काटा लढत होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे.