शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

थकीत ‘एफआरपी’त भाजप कारखानदार अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे ५३०० कोटींची एफआरपी थकीत असून ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे ५३०० कोटींची एफआरपी थकीत असून यामध्ये सर्वाधिक कारखाने हे भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांचे आहेत. ७३ सहकारी व खासगी कारखान्यांकडे तब्बल १५०५ कोटी थकीत असून त्यापाठोपाठ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ५३ कारखानदारांकडे १५०२ कोटी, तर कॉँग्रेसच्या ४४ कारखानदारांकडे १३४१ कोटी थकीत आहेत. थकबाकीच्या यादीत बहुतांश साखर कारखाने असले तरी इतर विभागांच्या तुलनेत कोल्हापूर विभागात थकबाकीचे प्रमाण काहीसे कमी आहे.केंद्र सरकारने यंदा एफआरपीच्या रकमेत थोडी वाढ केल्याने शेतकरी काहीसा खूश होता. तीन महिने एकसारखा पाऊस आणि त्यानंतर मारलेल्या दांडीने उसाचे उत्पादन घटणार ही चिंता घेऊनच यंदाचा हंगाम सुरू झाला. शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी करीत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. संघटनेसोबत तडजोड होऊन एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य करून हंगाम सुरू झाला. साखरेचे दर २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचा सूर कारखानदारांनी आळवला. सरकारने मदत करावी, यासाठी शिष्टमंडळांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आणि त्यात हंगाम दोन महिने पुढे गेला. दोन महिने उलटले तरी दमडीही न मिळाल्याने ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले. ‘एफआरपी’चे तुकडे पाडून कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे.राज्यात आतापर्यंत झालेले गाळप पाहता ५३०० कोटींची थकीत एफआरपी आहे. कारखानानिहाय आढावा घेतला तर सर्वाधिक थकबाकी ही सत्ताधारी भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांचीच अधिक आहे.त्यांच्या ७३ कारखान्यांकडे १५०५ कोटी थकीत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. राष्टÑवादीच्या ५३ कारखान्यांकडे १५०२ कोटी, तर कॉँग्रेसच्या ४४ कारखान्यांकडे १३४१ कोटी थकीत एफआरपी आहे. शिवसेनेच्या १२ कारखान्यांकडे २८५ कोटी, तर निव्वळ व्यावसायिक (राजकीय पक्षाशी संबंध नसणारे) असणाºया १४ कारखान्यांकडे ७१० कोटी अडकले आहेत.पक्षनिहाय थकीत एफआरपी :पक्ष कारखान्यांची थकीतसंख्या एफआरपी कोटींतभाजप ७३ १५०५राष्ट्रवादी ५३ १५०२कॉँग्रेस ४४ १३४१व्यावसायिक १४ ७१०शिवसेना १२ २८५शेकाप 0१ ५.३०एकूण १८६ ५३२३एफआरपी थकविणाºया कारखान्यांत सर्वाधिक भाजप व त्यांच्या सहयोगी मंडळींचे कारखाने असल्यानेच सरकार कारवाई करीत नाही. आता सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. एक तर एफआरपी द्या, नाही तर साखर जप्त करण्याचे आदेश देण्यास भाग पाडू.- खासदार राजू शेट्टी