कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आहे. या दिवशी राज्यातील २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पंचवीस तारखेला आणीबाणी विरोधी काळा दिवसही भाजपकडून पाळला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. त्यामुळे कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी योग शिबिरांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे.
चौकट : काँग्रेसी अत्याचार सांगण्यासाठी
घाटगे म्हणाले की, आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा काळा दिवस पाळण्यात येणार असून, राज्यात जिल्हा स्तरावर व्हिडिओ कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा व समाजमाध्यमांद्वारे जनतेला माहिती देण्यात येईल.
समरजित घाटगे यांचा सिंगल फोटो