शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची कोल्हापुरात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महावसुली सरकारचा तीव्र निषेध करणाऱ्या ...

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महावसुली सरकारचा तीव्र निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘१०० कोटी माझे.....आता नाहीत वाझे माझे’, ‘महावसुली सरकारचा धिक्कार असो’, ‘गृहमंत्री राजीनामा द्या’ ‘अनिल देशमुख हे गृहमंत्री की....वसुली मंत्री’, ‘अनिल देशमुख यांचा धिक्कार असो’, ‘ठाकरे सरकार चले जाओ’, ‘आता तर हे स्पष्ट आहे....ठाकरे सरकार भ्रष्ट आहे’ असे फलक घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते.

भाजप सरचिटणीस हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय जाधव, विजय जाधव, अशोक देसाई यांनी हा घडलेला प्रकार म्हणजे फक्त हिमनगाचे टोक असून यापुढे देखील असा प्रकारचा भ्रष्टाचार समोर येणार आहे. याप्रकरणात सचिन वाझे यांची नार्को टेस्ट घेऊन यामधील सर्व मंत्री, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

वीजतोडणीसाठी सर्वसामान्य जनतेच्या दारात जातात आणि १०० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पाठराखण या महाराष्ट्रात होत असेल तर ही खरोखरंच निंदनीय गोष्ट आहे. वीजतोडणीप्रश्नी यापुढे जर वीजतोडणीसाठी ‘महावितरण’चे कर्मचारी येत असतील तर त्याला जाब विचारून प्रसंगी भारतीय जनता पार्टी संघर्ष करण्यात मागे हटणार नाही तसेच काल एका व्यक्तीने वीजतोडणी करायला ‘महावितरण’चे लोक आले असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने जर कोणी दगावले तर याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल, असे राहुल चिकोडे यांनी सांगितले

यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, उपस्थित होते.

फोटो नसीर अत्तार

फोटो ओळ : भाजपच्यावतीने रविवारी सकाळी कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली.