शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्मी’ कमळाच्या आडून भाजपचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:03 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हरियाणा, उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ रेखाटले. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हरियाणा, उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ रेखाटले. त्याचा चांगला परिणाम सत्ता येण्यात झाल्याने हा फंडा महाराष्ट्रातही वापरला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रहदारीच्या ठिकाणी ‘लक्ष्मी’ कमळ रेखाटले जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५०० कमळ भिंंतीवर रेखाटली जाणार असून, निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत अडकू नये म्हणून भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाऐवजी ‘लक्ष्मी’च्या हातातील ‘कमळ’ काढले जात आहे.देशात रोज नवतंत्रज्ञान येत असून सर्वच यंत्रणा झपाट्याने बदलत आहेत. सारा देश सोशल मीडियाशी जोडल्याने निवडणुकीची प्रचार यंत्रणाही गतिमान झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. यामध्ये सर्वांत पुढे भाजप हा पक्ष असून हायटेक प्रचारयंत्रणेच्या बळावरच त्यांनी सारा देश भगवामय केला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणासह उत्तरेकडील अनेक राज्यांच्या निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ हा फंडा राबविला होता. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी ‘कमळ’ रेखाटलेले दिसते. आतापर्यंत ते शहरात ९०० ठिकाणी रेखाटले असून, येत्या आठ-दहा दिवसांत ६०० ठिकाणी ‘कमळ’ रेखाटले जाणार आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये पांढऱ्या गोलामध्ये कमळ रेखाटले आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये पाण्यातून हात वर आला आणि त्या हातात असलेले कमळ रेखाटले आहे. यावर कॉँग्रेसने हरकत घेतली असली तरी निवडणूक आयोगाने हरकत घेऊ नये म्हणून पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह आणि या कमळात थोडा फरक केला आहे.‘कमळा’च्या शेजारी ‘हात’ येणारशहरात भाजपच्या वतीने ‘कमळ’ चिन्ह रेखाटले आहे. त्यावर कॉँग्रेस पक्षाने हरकत घेतली तरी ते काढून टाकणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे जिथे ‘कमळ’ रेखाटले आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना ‘हात’ रेखाटण्याची सूचना कॉँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.लोकसभेच्या तयारीचा आढावाभाजपने लोकसभेची जोरदार तयारी केली असून लोकसभा मतदारसंघनिहाय बूथ कमिट्यांकडून आढावा सुरू आहे. मंगळवारी भाजपचे संघटन सचिव रवी अनासपुरे व मकरंद देशपांडे यांनी ‘कोल्हापूर ’व ‘हातकणंगले’ मतदारसंघांचा आढावा घेऊन घर ते घर संपर्क मोहिमेचे आदेश दिले.