शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नव्याने टोल लादतंय : अजित पवार

By admin | Updated: February 2, 2015 23:41 IST

केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्यावेळी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन देत भाजप सत्तेवर आले. मात्र, तेच आता जनतेची दिशाभूल करत नव्याने टोल लादत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.शहर, जिल्हा राष्ट्रवादीतर्फे येथील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज, सोमवारी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, भाजपची भूमिका दुटप्पी आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी समिती नेमून चोथा केला आहे. समितीच्या पुढे काहीही निर्णय होत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, असे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भाजप आणि शिवसेना जातीयवादी पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ेकार्यकर्त्यांनी सतर्कपणे पक्षबांधणीसाठी योगदान द्यावे. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पैसे मिळालेले नाहीत.खासदार धनंजय महाडिक हे सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महाडिक यांनी केवळ शहरापुरतेच न राहता सर्व तालुक्यांत पक्षसंघटना मजबूत करावी. शिधापत्रिकेवरील रेशन बंद केल्याच्या विरोधात ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्णातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहे. नाव न घेता शेट्टींवर टीकास्त्र.बारामती, कराड, इंदापूर येथे जाऊन आंदोलन करणारे खासदार आता ‘बघ्याची भूमिका’ घेत आहेत, असा नामोल्लेख टाळत खासदार राजू शेट्टी यांच्यावर पवार यांनी टीकास्र सोडले. एफआरपी न देणाऱ्यांवर कारवाईची धमकी देण्याशिवाय काहीही झालेले नाही. भाजपच्याही नेत्यांचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम अजून दिलेली नाही. कारवाईचा इशारा देऊन काहीही होत नाही, असे पवार म्हणाले.