शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना भाजप सरकारचे पाठबळ का..?

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विचारणा : कारवाईस सरकारकडून मुद्दाम विलंब

कोल्हापूर : लाच घेणाऱ्या मंत्रालयातील लिपिकास सापळा रचून पकडून देणारे मुख्यमंत्री कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांना का पाठीशी घालत आहेत, अशी विचारणा उपमहापौर मोहन गोंजारे, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने येथे असल्याने हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.त्यात म्हटले आहे, ‘महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारीस महासभेने मंजूर केलेल्या ठरावावर सही करण्याकरिता लाच स्वीकारण्याच्या तक्रारीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महापौर कार्यालयातच पकडले. नैतिकतेचा विचार करून महापौर राजीनामा द्यायला तयार नाहीत. उलट ज्या पक्षाने, नेत्याने, नगरसेवकांनी त्यांची बिनविरोध निवड केली, त्यांच्यावरच त्या उलटे आरोप करून बिनदिक्कतपणे कामकाज करत आहेत. त्यामुळे महापालिका सभागृह व जनतेचाही अपमान होत आहे. विद्यमान सभागृहाने १८ मार्चला महासभेमध्ये महापौरांविरोधात मुंबई महापालिका अधिनियमांनुसार कलम १०(१-१) व ‘कलम १३’ अन्वये अशोभनीय कृत्याबद्दल त्यांचे नगरसेवकपद व या कृत्यात महापौर दोषी आढळत असल्यास महापौर पदावरूनही त्यांना पदच्युत करण्याची कारवाई करावी, असे दोन ठराव ७२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करून पाठविले आहेत. या ठरावावर भाजपच्या सरकारने कारवाई का करण्यात येऊ नये, असा लेखी खुलासा महापौरांकडे मागितला आहे. याबाबत मुख्यमंत्री व कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहेत. तरीही ज्या तत्परतेने त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, त्या प्रमाणात ती होत नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून दाखवावीएकेकाळी मुख्यमंत्री फडणवीस लाच घेणाऱ्यांना पकडून देतात व आपण लाचखोर प्रवृत्तीविरोधात असल्याचे दाखवितात. मग महापौरांना सापळा रचून पोलिसांनीच पकडले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात कागदी घोडे नाचवून दिरंगाई केली जात आहे. यामागे राजकारण आहे हे कोल्हापूरची जनता ओळखून आहे. येत्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसविरोधी प्रचारात या प्रकरणाचा उपयोग करता यावा, यासाठीच भाजप-शिवसेना सरकार कारवाईस उशीर करत आहे, असा आमचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी महापौरांवर कारवाई करून आपण बोलतो तसेच करतो हे दाखवून द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.