शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सरकारने -शेतीमालाचे दर पाडले

By admin | Updated: February 18, 2017 00:01 IST

जयंत पाटील : दुधगाव येथे जाहीर सभा

दुधगाव : खरे तर पेट्रोल, डिझेल, लोखंड, सिमेंटच्या दरवाढीने महागाई वाढत असताना, शेतीमालाच्या दरवाढीने देशातील महागाई वाढते, अशी धारणा मोदी सरकारची आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक शेतीमालाचे दर वाढू देत नाहीत, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला.दुधगाव (ता. मिरज) येथील मुख्य चौकात राष्ट्रवादीच्या जि. प. व पं. स. उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. उमेदवार सौ. सुनीता प्रमोद आवटी, पं़ स़ उमेदवार सौ़ सुनीता धनाजी पाटील उपस्थित होत्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, भीमराव माने, बिनविरोध निवड झालेले काँग्रेसचे पं. स़ सदस्य, माजी सभापती अनिल आमटवणे, पं़ स़ सदस्य प्रमोद आवटी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, रवींद्र माणगावे, माजी सरपंच सौ़ शालिनी कदम, सौ. अनिता धनवडे, उपसरपंच संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. पाटील म्हणाले, या मतदार संघातील आपण सर्वजण एकत्रितपणे प्रचाराला लागला आहात. मतदार संघातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.माजी उपसरपंच विलास आवटी यांनी प्रास्ताविक केले़ याप्रसंगी कवठेपिरानचे सर्जेराव पाटील, उपसरपंच सागर पाटील, श्रीकांत वडगावे, तुंगचे भास्कर पाटील, धनाजी पाटील, बजरंग मोहिते, नितीन दणाणे, छायाताई जाधव, प्रमोदिनी हुसुकले, दुधगावचे विकास कदम, बालेचाँद शिकलगार, संभाजी गावडे, विजय आडमुठे, सचिन आडमुठे, नरेंद्र साजणे, महावीर आवटी उपस्थित होते. उपसरपंच संजय देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)राजू शेट्टींचा ‘यू टर्न’ कसा काय? आ. जयंत पाटील म्हणाले की, राजू शेट्टी यांनी सदाभाऊंचा मुलगा निवडणुकीस उभा राहिल्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली़ मात्र दुसऱ्याचदिवशी त्यांनी यू टर्न घेतला़ आपण काय बोललो आणि काय वागतो आहोत? याचा विचार व्हायला हवा़ जेव्हा माणूस तत्त्वापासून लांब जातो, तेव्हा लोकही अंतर देतात, याची जाणीव ठेवायला हवी़