शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सा. रे. पाटील यांचे पुन्हा एकतर्फी वर्चस्व

By admin | Updated: July 22, 2014 23:59 IST

दत्त कारखाना निवडणूक : विधानसभेला राजकीय गणित बदलणार

संदीप बावचे- शिरोळगेल्या बेचाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सत्ताधारी गटाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी ‘दत्त’वरील आपले पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे. बिनविरोधचा हा निकाल तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आलीच. ‘दत्त’च्या या आंदोलन केंद्रातून खा. राजू शेट्टी यांची कारकीर्द सुरू झाली होती. या चळवळीतून खा. शेट्टी लोकसभेत पोहोचले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानंतर श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींमध्ये कारखान्याने मनमानी नियम केल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दत्त’च्या या रणांगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी सभासदांत संभ्रमावस्था निर्माण झाली. या निवडणुकीत स्वाभिमानीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ‘दत्त’ची ही निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. वास्तविक मल्टिस्टेट कायद्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करणे गरजेचे होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी राजकारणातील डावपेच खेळून आपली ४० वर्षांतील ‘दत्त’वरील पकड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वयाच्या ९४व्या वर्षी देखील त्यांची काम करण्याची पद्धत निश्चित वाखाणण्यासारखी आहे. राजकारणापेक्षा सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ठ प्रशासनाची सांगड घालून ‘दत्त’ उद्योग समूहात केलेली लक्षणीय प्रगती याची प्रचितीच या निकालातून स्पष्ट झाली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘दत्त’चा हा निकाल राजकीय गणित मांडणारा ठरणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सा. रे. पाटील यांनी मिळविलेल्या यशामुळे सध्या ‘फिलगूड’चे वातावरण तयार झाले आहे.