शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सा. रे. पाटलांच्या विचारांचा वारसा जपू

By admin | Updated: April 3, 2015 23:56 IST

राजेंद्र पाटील-यड्रावकर : जयसिंगपूरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा

जयसिंगपूर : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी कायम झुंजणारे नेते सा. रे. पाटील यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत तळागाळातील लोकांचे काम केले. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. त्यांच्या निधनाने तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासू, अशी भावना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केली. नगरपालिकेची नवीन इमारत बांधून ग्रंथालयाला स्व. सा. रे. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. येथील नगरपालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित शोभसभेत ते बोलत होते.नगराध्यक्ष सुनीता खामकर म्हणाल्या, शिक्षण, सहकार, राजकारण क्षेत्रात सा. रे. पाटील हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढाकार घ्यावा. धाडसी व स्वावलंबी बनावे, यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले, अशा थोर नेत्यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.नगरपालिकेच्या माध्यमातून जयसिंगपुरात सा. रे. पाटील यांची स्मृती कायम राहावी यासाठी त्यांचे स्मारक उभारावे, अशी भावना माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केली. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींना उजाळा दिला.रघुनाथ देशिंगे, प्रसाद नाईक, भाजपचे राजेंद्र दार्इंगडे, नगरसेवक शिवाजी कुंभार, संगीता पाटील, रमेश यळगुडकर, विठ्ठल मोरे, दिलीप मगदूम, अर्जुन देशमुख, भूपाल विभूते, भगवंत जांभळे यांनी शोकसभेत भाग घेतला. यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष स्वाती पडूळकर, विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( प्रतिनिधी )