शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘बाजारगेट’मध्ये ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार

By admin | Updated: October 24, 2015 01:07 IST

नवोदित रिंगणात : कुंभार, जोशी-गोंधळी, मुस्लिम समाजाची मते निर्णायक

कोल्हापूर : रहिवासी, व्यापारी आणि सर्व जाती-धर्मांनी वास्तव्य असलेला प्रभाग म्हणून ‘बाजारगेट’ची ओळख आहे. या प्रभागात कुंभार, जोशी-गोंधळी व मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या समाजाची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. सर्वच उमेदवार विजयाचा दावा करत असले तरी या वेळेला या प्रभागात ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार असल्याचे दिसते.बाजारगेट प्रभागात (क्रमांक ३१) आजपर्यंत या तिन्ही समाजाच्या मतांवरच निकाल ठरला आहे. या वेळेला हा प्रभाग ‘नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) महिला’साठी राखीव झाला आहे. विद्यमान नगरसेवक श्रीकांत बनछोडे हे या प्रभागाचे प्रतिनिधी आहेत. श्रीकांत बनछोडे यांच्या विकासकामांच्या जोरावर व जनसंपर्कावर त्यांच्या स्नुषा उमा बनछोडे या काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचाही घरोघरी प्रचार सुरू आहे. त्याचबरोबर माजी नगरसेविका सुवर्णा सांगावकर यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहे. त्यांनी गेली तीन महिने प्रभाग पिंजून काढला आहे. विशेषत: त्यांना महिलावर्गातून पाठिंबा मिळत आहेत. त्यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे. निवडून आल्यावर प्रथम बाजारगेट प्रभागाचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे दीर माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर यांच्या पूर्वीच्या खोलखंडोबा मतदारसंघात येणारी तेली गल्ली, नाभिक गल्ली एक बाजू या प्रभागात समाविष्ट झाल्याने त्याचा फायदा आहे.या वेळेला माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर यांच्या नात्यातील शशिकला गजगेश्वर या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले भरत काळे यांच्या पत्नी मंगल काळे यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे जोशी समाजातील दुसऱ्या उमेदवार मंगल भरत काळे या अपक्ष म्हणून निवडणुकीत उभ्या आहेत. त्यामुळे जोशी समाजात मतांची विभागणी होऊन विरोधकांच्या पथ्यावर पडणार हे स्पष्ट असले तरी शशिकला गजगेश्वर व मंगल काळे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. या दोघीही आम्हाला जोशी समाजाचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत.त्याचबरोबर प्रणाली विक्रम मोतीपुरे या भाजप-ताराराणी आघाडीकडून कपबशी चिन्ह घेऊन लढत आहेत. त्यांनी सर्व भाग पिंजून काढला आहे. त्यांनाही पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून आफ्रिन मुश्ताक मुल्ला या आहेत. त्या ‘शिट्टी ’हे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत. त्यांनीही घरोघरी प्रचार सुरू केला आहे. एकंदरीत, बाजारगेट प्रभागातील मतदार आम्ही सर्वांच्या पाठीशी राहत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमका त्यांचा कल कोणाकडे हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे यावेळेला ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)