शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील : नरके

By admin | Updated: October 1, 2015 00:39 IST

कुंभी कारखाना सभा : मात्र साखरेच्या दरावर एफआरपी देण्याचे धोरण ठरविणार

कोपार्डे : शेतकऱ्यांना उचित व लाभधारक मूल्य (एफआरपी) प्रमाणे दर मिळालाच पाहिजे. एफआरपीप्रमाणे दर देण्यास कुंभी-कासारी कारखाना बांधील आहे. मात्र, भविष्यात साखरेच्या दरावर एफआरपी कशी द्यावयाची याचे धोरण ठरविले जाईल, असे ‘कुंभी’चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रतिपादन केले.‘कुंभी’च्या कार्यस्थळावर ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शामराव गोधडे व संचालक उपस्थित होते. ही सभा तब्बल चार तास चालली.आपल्या प्रास्ताविकात आमदार नरके म्हणाले, या हंगामात एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांची २६४० प्रतिटनाप्रमाणे सर्व देणी अदा केली आहेत. यावेळी एफआरपीचा दर साखरेच्या दराशी निगडित असावा, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर एफआरपी व साखर दर यामधील असणारा फरक शासनाने अनुदान स्वरूपात द्यावा, असे मत मांडले.यावेळी बाजीराव खाडे यांनी पाळीपत्रक विस्कळीत झाल्याने मागील वर्षीपेक्षा यावर्षी उताऱ्यात घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याला कारखाना सुरू असताना निर्माण झालेले तांत्रिक दोषही कारणीभूत आहेत, असा आरोप केला. यावेळी आमदार नरके यांनी यावर्षी जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीने उताऱ्यात परिणाम झाल्याचे सांगितले.यावेळी नफा-तोटा पत्रकावरून बाळासाहेब खाडे, राजू सूर्यवंशी यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी आमदार नरके यांनी कुंभी-कासारीचे नक्तमूल्य ४६ कोटी ३७ लाख रुपये अधिक असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी कर्जाचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. आमदार नरके यांनी १९५ कोटी कर्ज दिसत असले तरी चालू जिंदगी १७४ कोटी ५३ लाख असल्याचे सांगितले. यामध्ये सहवीज प्रकल्पाचे ८८ कोटी कर्ज असले, तरी हे फेडण्यासाठी सात वर्षांची मुदत आहे. या हंगामातील सहवीज प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून १८ कोटी ७५ लाखांची वीज विक्री करण्यात आली असून, यातून दहा कोटी कर्जाच्या मुद्दलीतील, तर नऊ कोटी व्याज भागविले आहे. त्यामुळे सहवीज प्रकल्प फायद्यातच आहे, असे सांगितले. अखेर विरोधकांचे कर्जाच्या आकड्यावर समाधान झालेच नाही. आमदार नरके यांनी मात्र हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जाचा बागुलबोवा विरोधक तयार करीत असल्याचा आरोप केला.यावेळी पी. जी. पाटील व अ‍ॅड. प्रकाश देसाई यांनी कारखाना फायद्यात असेल, तर एफआरपी एकरकमी जाहीर करा, असे आवाहन केले. पी. जी. पाटील यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी आमदार नरके यांनी जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या बाबतीत अशीच भूमिका ठेवा, अन्यथा कुंभी एफआरपीसाठी बंद व इतर कारखाने सुरू, असे झाल्यास आपल्याच कारखान्याचा तोटा होणार आहे. एकरकमी एफआरपीसाठी शासनाबरोबर लढा उभारण्यास मीही तुमच्या बरोबर आहे, असे सांगितले.सभा कुंभीची, चर्चा इतर कारखान्यांचीसभा अत्यंत चर्चात्मक सुरू असताना इतर कारखान्यांचे अहवाल सादर करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण तयारीनिशी असणाऱ्या आमदार नरके यांनी माल खरेदीत आपणच कमी असल्याचे अहवालात सिद्ध केले.संदीप नरके जमिनीवरप्रत्येक सर्वसाधारण सभेत संदीप नरके सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसत होते. यावेळी त्यांनी ‘ना सत्ताधाऱ्यांत, ना विरोधात’ बसत थेट समोर बसलेल्या सभासदांच्यात भारतीय बैठक मारली. यावेळी आमदार नरके यांनीही त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी फोन केला. मात्र, त्यांनी खुर्चीवर बसण्यास नाकारले.