पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतीक प्रकाश पाटील (वय २४, रा. कळंबा) यांची दुचाकी मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे फाटक दरम्यान मार्गावरून चोरीला गेली. त्यावेळी त्यांनी मित्र महादेव मोरे व अभिजित मोरे यांना फोन करून घटनास्थळी तातडीने बोलवून घेतले. तिघांनी मिळून रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेल्या दुचाकीची शोधाशोध केली. त्यावेळी पारिख पूल ते टाकाळा या मार्गावर अंधाराचा फायदा घेऊन श्रावण बुचडे, रितेश नायर हे दोघे एका दुचाकीची नंबरप्लेट बदलत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तिघांनी या दोघा चोरट्यांना पकडले. ही चोरीची दुचाकी लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दोघांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
अटक केलेल्यांपैकी श्रावण बुचडे हा सराईत असून, त्याच्यावर रॉबरी व दुचाकी चोेरीचे गुन्हे दाखल आहेत, तर संशयित रितेश नायर हा पदवीधर असून टेलरिंग व्यवसाय करतो. दोघांनाही शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केेले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करण वावरे करत आहेत.
फोटो नं. ०२१२२०२०-कोल-श्रावण बुचडे (चोरी)
फोटो नं. ०२१२२०२०-कोल-रितेश नायर (चोरी)
(तानाजी)