शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाईक स्टाईलची धूम आता धोकादायक वळणार

By admin | Updated: February 5, 2016 23:59 IST

तरुणाईचा अतिउत्साह : महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी ‘ब्रेक’ लावण्याची गरज

आयुब मुल्ला -- खोची  महाविद्यालयीन तरुणाईच्या मैत्रीला, प्रेमाला अनेक कंगोरे धारण होत चाललेले आहेत. फॅशनच्या दुनियेत बाईकची स्टाइल धूम ठोकू लागली आहे. मुलगा-मुलगी तोंडावर स्कार्प बांधून रस्त्यांवरून नुसत्या गतीने नाही तर अतिवेगाने सुसाट धावताना दिसतात. हा वेग कामाच्या गडबडीत वेळेत पोहोचले पाहिजे यासाठी नसतो तर तो ईर्ष्येच्या स्टाईलचा असतो. यातूनच घात- अपघाताचे वाढते चित्र पहावयास मिळत आहे.महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी पायबंद घातलाच पाहिजे. नाही तर तरुणाईची धूम स्टाईल आणखीन गती घेईल अन् पालकांना त्याचा पश्चात्ताप सहन करावा लागेल.सध्या अशा स्टाईलची चलती जादा आहे. कारण हा कालावधी टॅ्रडिशनल डे, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या रेलचेलीचा आहे. जादा अभ्यास नाही, परीक्षा तोंडावर नाहीत. त्यामुळे वर्षातील हा कालावधी जल्लोषाचा असल्याचे महाविद्यालय परिसरात जाणवते. वास्तविक तरुणाईच्या कलागुणांना संधी देणे म्हणजे गॅदरिंग होय. त्यांच्या दृष्टीने ही एक पर्वणीच असते.सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून तो पार पडेपर्यंत अमाप उत्साह तरुणार्इंच्यात वावरत असतो; परंतु त्याचा लूकच बदलत चालला आहे. प्रामाणिकपणे आनंद साजरा करतो येतो; परंतु अतिउत्साही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी मात्र गैरवर्तनाच्या मार्गाचा अवलंब करतात.पॉकेटमनी जास्त असतो. घरचेही अशा काळात फारसे लक्ष देत नाहीत. नेमक्या याच बाबींचा फायदा मैत्रीच्या, प्रेमाच्या नावाखाली लुटला तर जात नाही ना असे प्रश्न जाणकार व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञाने बनलेल्या बाईक, ती चालवणारा युवक, पाठीमागे बसलेली मैत्रीण, दोघांच्याही तोंडावर स्कार्प त्यामुळे आम्हाला कोण ओळखू शकत नाही, अशा गैरसमजुतीतून ते रस्त्यावरून सुसाट असतात.स्टँड, हॉटेल, गार्डन, क्रीडांगण या ठिकाणीसुद्धा एकत्रितपणे अशी जोडपी आढळतात. ग्रामीण भागांतून शहरात आलेल्या व्यक्तींना हे चित्र पहायला मिळाल्यानंतर त्यांच्यात प्रश्नांची अंतर्गत सरबत्ती झाल्याशिवाय राहत नाही. मुळात शिक्षणाला महत्त्व देण्याचे प्रमाण सगळीकडेच वाढले आहे. तो निर्णयही स्वागतार्ह आहे; परंतु त्यातून चांगले परिणाम दिसले पाहिजेत. परीक्षा, क्रीडा प्रकारात बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यांना सगळेजण शाबासकी देतात, पण काहीजण मैत्री, प्रेम सारखे बदलत आहेत. हे ते सर्व प्रसिद्धीसाठी खटाटोप करीत आहेत. ते थांबविण्यासाठी समाजातील जबाबदार घटकांनी पुढे आले पाहिजे. शाळा, कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये आकर्षण असते; परंतु ते क्षणिक असते. क्षणिक आकर्षणामुळे ते काही काळासाठी एकत्र येतात. त्यातून बहुतांश प्रमाणात अडथळेच निर्माण होतात. अखेर त्यांच्यामध्ये जी समस्या निर्माण होते, तिचे सामाजिक समस्येत रूपांतर होते. यासाठी आम्ही प्रबोधनाचे काम शाळा, महाविद्यालयात जाऊन करीत आहोत, असे जाधव म्हणाले.दुचाकीवरून टिंगळटवाळी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सुरू आहे. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. संरक्षणाची जबाबदारी सर्वच पद्धतीने हाताळली जात आहे.- धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, पेठवडगाव