शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST

पतंगराव कदम : आटपाडीत दुष्काळाचा आढावा

खरसुंडी : बिहार राज्याचा निकाल हा मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेल्या खोट्या अश्वासनांचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरसुंडी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. नेलकरंजी येथील सभागृहाचे व खरसुंडी येथील विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, जनेतचा मतप्रवाह बदलत असून, भविष्यात कॉँग्रेसप्रणित सरकार देशात व राज्यात येणार आहे. तरी कार्यक र्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊन रस्त्यावर उतरावे. आपण पालकमंत्री असताना जनतेसाठी व जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधी कमी पडू दिला नाही. म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना पूर्ण करून शेतीच्या पाण्यासाठी टंचाई निधीतून निधी उपलब्ध करून दिला. सध्याचे युती सरकार निधीसाठी टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोहनकाका भोसलेंसारख्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने तालुक्यातील तलाव बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे बांधले गेल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांचाच वारसा जयदीप भोसले चालवत असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही कदम यानी यावेळी केले. प्रास्ताविक शशिकांत देठे यांनी केले. यावेळी युवक कॉँग्रेसचे राजू मोरे, प्रदीप पाटील, राहुल गायकवाड, विजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या रुक्मिणीताई यमगर, पार्वती पुजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकार उदासीन आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांबाबत स्थायी आदेश शासनाने काढले होते. बजेटची चिंता न करता उपाय योजनांवर आणि मदतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सध्याचे सरकार दुष्काळाबाबतीत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही, असे कदम यावेळी म्हणाले.