शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जयसिंगपूर नगरपालिकेचे ‘बिग बजेट’ मंजूर

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

करवाढ नसलेला अर्थसंकल्प : २०१५-१६ साठी ७८ कोटी ९४ लाख ४२ हजारांची तरतूद

जयसिंगपूर : कोणतीही करवाढ न करता सन २०१४-१५ च्या सुधारित आणि सन २०१५-१६ च्या वित्तीय वर्षाच्या चार कोटी १९ लाख ८२ हजार ८१९ रूपये एवढ्या शिल्लकी अंदाजपत्रकास नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खामकर होत्या. पालिकेच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा बजेट मंजूर झाला आहे.२०१४-१५ चा सुधारित अर्थसंकल्प व २०१५-१६ चा स्थायी समितीच्या मंजुरीने आलेल्या अर्थसंकल्पास मंजुरीसाठी गुरूवारी पालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात विशेष सभा झाली. विषय वाचन अनिल तराळ यांनी केले. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजूस ७८ कोटी ९४ लाख ४२ हजार ४१९ रुपये, तर खर्चाच्या बाजूस ७४ कोटी ७४ लाख ५९ हजार ६०० रुपये दाखविली आहे. अर्थसंकल्पात झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर, भुयारी गटर योजना, सीसीटीव्ही कॅमेरे, निर्मल शहरासाठी अनुदान, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण, एलईडी पथदिवे, अपंग, आर्थिक दुर्बल घटक व योग्य तरतुदी केल्या आहेत. नगरसेवक शिवाजी कुंभार यांनी पालिका स्वयंभू होण्यासाठी प्रशासनाबरोबर नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षण विभागाला ६० लाख आजच्या अर्थसंकल्पात पालिका शिक्षण मंडळासाठी ६० लाख रूपये मंजूर करण्यात आले. यावेळी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्याची गरज असून बालवयातच चांगले संस्कार देण्यासाठी सर्वांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. समाविष्ट योजनाझोपडपट्टीवासीयांसाठी घर, शिवाजी महाराज पुतळा उभारणी, भुयारी गटर योजना राबविणे, प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, एलईडी पथदिवा प्रकल्प, २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जॅकवेल व फिल्टर हाऊस बांधणे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे, मिळकतधारकांच्या नावे विमा योजना, न.पा. शिक्षण मंडळाकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावे विमा योजना, पालिकेच्यावतीने लवकरच इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याची घोषणा देखील यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी केली.जमा बाजूसर्व करांतून - ३ कोटी ८३ लाख ९१ हजारसेवा मालमत्ता - ६५ लाख ५३ हजार १५५महसुली अनुदाने - ६ कोटी ६१ लाख १८ हजारकिरकोळ उत्पन्न - ५३ लाख ४१ हजार ७००विकासकामांसाठी अनुदान - ५४ कोटी ४२ लाख ४ हजारअसाधारण जमा - २ कोटी ६६ लाख ३१ हजारआरंभी शिल्लक - १ कोटी १५ लाख १८ हजार ५६४खर्च बाजूआस्थापना खर्च - ६ कोटी १२ लाखपाणीपुरवठा, वीज बिल - १ कोटी १३ लाख शिक्षण मंडळ - ६० लाख कर्ज हप्ते - १४ लाखघर तेथे शौचालय योजना - १० लाखसीसीटीव्ही कॅमेरे बसविणे - ५ लाखभुयारी गटर योजना राबविणे - ३० कोटीजॅकवेल फिल्टर हाऊस बांधणे - ५ कोटी(यासह एकूण २३ घटकांवर खर्च केला जाणार आहे.)