शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा चेंडू सरकारच्या ‘कोर्टात’

By admin | Updated: February 18, 2016 21:15 IST

उच्च न्यायालयात सुनावणी : ‘सरकार निर्णय घेण्यास स्वतंत्र’; अनेक वर्षांपासून प्रलंबित हद्दवाढ दृष्टिक्षेपात

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी सूचना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. या सुचनेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावावर राज्य सरकारला निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. मात्र, हद्दवाढ करण्यासाठी कोणताही आदेश राज्य शासनाला न देता हद्दवाढ रद्द केलेला मागच्या सरकारच्या आदेशात सुद्धा हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला व जनहित याचिका फेटाळल्याचे हद्दवाढ विरोधी कृती समितीचे वकिल धैर्यशील सुतार यांनी म्हटले आहे. राज्य शासन हद्दवाढीच्या अधिकाराचा वापर करण्यास स्वतंत्र आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अजित सासने, किशोर घाडगे आदी कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर यापूर्वी तीनवेळा सुनावणी झाली होती. बुधवारी त्यावर न्यायालयात न्या. नरेश पाटील व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला निर्णय घेण्याची सूचना केल्याचे म्हटले आहे. हद्दवाढ करण्याच्या विषय हा राज्य सरकारचा असल्याने थेट आदेश देता येत नाही, म्हणून न्यायालयाने राज्य सरकारला कोल्हापूर महानगरपालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे सुचविले. राज्य सरकारचे वकील विकास माळी यांनी हद्दवाढीसंदर्भातील यापूर्वीचे तीन प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळले आहेत, त्यामुळे त्याच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा होणे बरोबर नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांचे वकील युवराज नरवणकर यांनी सांगितले की, ‘हद्दवाढ करण्याच्याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेने कायदेशीर प्रक्रिया राबवून सन २००९, २०१० व २०११ मध्ये एकूण प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले आहेत. मात्र, राज्य सरकारने ‘सध्या शहराची हद्दवाढ करणे उचित नसल्याने आपला प्रस्ताव फेटाळण्यात येत आहे,’ असा एक ओळीच्या पत्राद्वारे दि. १३ जून २०१५ रोजी महानगरपालिकेला कळविण्यात आले. त्यासाठी कोणतेही कारण दिले नाही. प्रस्ताव फेटाळण्यासाठी जी आवश्यक प्रक्रिया राबवावी लागते ती राबविलेली नाही. उलट जून २०१५ मध्ये पुन्हा राज्य सरकारने प्रस्ताव मागवून घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह तो राज्य सरकारकडे पोहोचलाही आहे. त्यामुळे सरकारने थेट अधिसूचना काढून हद्दवाढीचा निर्णय घ्यावा, तसा आदेश सरकारला द्यावा’. राज्य सरकारचे वकील आणि याचिकाकर्त्यांचे वकील या दोघांची बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने यासंदर्भात सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यावर अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी मुदत घालून द्यावी, अशी विनंती केली; परंतु ती अमान्य करत सरकार काय करते ते बघून नंतर मुदत घालून देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)हद्दवाढ विरोधी समितीचे म्हणणे..शासनास हद्दवाढ करण्याची प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यासाठी कोल्हापूर येथील आर के पोवार व इतर नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये हद्द्वाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांना हस्तक्षेप अर्ज वकील धैयर्शील सुतार यांचे मार्फत दाखल केला. खंडपीठाने राज्य शासनाने मार्च मध्येच हद्दवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला व त्यानंतर लगेच महापालिकेने तीन महिन्यांत नवीन ठराव करत प्रस्ताव सादर केला त्यावर कसे काय न्यायालय आदेश देऊ शकते, असा सवाल याचिकाकर्त्यांना केला. वारंवार उच्च न्यायालयात येऊन न्यायालयाचे आदेश मागणे गैर असल्याचे न्यायालयाने म्हटले. हद्दवाढ करणे अथवा न करणे हा पूर्णपणे सरकारच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याने न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. याचिकेत राज्य शासनाला कोणताही आदेश देता येणार नसल्याचे सांगत याचिका फेटाळली. हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे २१ गावातील ग्रामस्था तर्फे नाथाजीराव पवार व इतर ग्रामस्थांच्यावतीने वरिष्ठ वकील राजीव चव्हाण व वकील धैयर्शील सुतार यांनी बाजू मांडली.सरकार सकारात्मक शहराची हद्दवाढ करण्यास भाजप सरकार सकारात्मक असून, त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत. महानगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून घेत जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्रायसुद्धा मागविला आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अशाच सूचना यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी हद्दवाढीसंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदत घालून दिली होती. तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने महानगरपालिकेचा प्रस्ताव नाकारून हद्दवाढ करण्यास असमर्थता दाखविली होती. पाठोपाठ अधिसूचनाही रद्द केली होती.