शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

सरवडे : बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील ...

सरवडे : बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक आजारी पडत असून मृत माशांचा खच व पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याने नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखावे अन्यथा कारखान्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा इशारा बिद्रीच्या नदीकाठावरील लोकप्रतिनिधींनी निवेदनाद्वारे दिला.

याबाबत माहिती अशी : गेल्या १५ दिवसांपासून दररोज रात्री दहाच्या दरम्यान दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येते. मळी नदीत मिसळल्याने नदीकाठावरील जवळजवळ पन्नास ते साठ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक गॕॅस्ट्रोने आजारी पडले आहेत. नदीत मृत माशांचा खच व पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिद्री,वाळवे खुर्द, कसबा वाळवा, कासारवाडा, चंद्रे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, सोनाळी, चांदेकरवाडी, बेळवळे खुर्द, बेलवळे बु. केबळी, बाचणी, पालकरवाडी, आदी प्रमुख गावांतील शेकडो नागरिक यामुळे आजारी पडले आहेत.

कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या टेबलावर बादलीत दूषित पाणी ओतून कारखाना प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध केला. कारखान्याने याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर कारखान्याच्या संचालकांना दूषित पाणी पाजू व कारखान्यावर फौजदारी करू. यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. देसाई म्हणाले, नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याबाबत माहिती घेऊन योग्य उपाययोजना केली जाईल.

शिष्टमंडळात बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, भास्कर खोत, प्रवीण खोत, उपसरपंच, पंचायत समितीचे सदस्य जयदीप पोवार, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उत्तम पाटील, उपसरपंच बाचणी, गोरख पाटील, सुदर्शन पाटील, शंकर पाटील- बेलवळे बु., बंडोपंत पाटील, सदाशिव मांडवकर, राजाराम सिरसट, नामदेव फराकटे, सचिन आबदार, सरपंच भाऊ पालकर उपस्थित होते.

...... फोटो : बिद्री साखर कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन देताना नामदेव चौगले, अशोक फराकटे, बाळासाहेब पाटील व इतर उपस्थित होते.