शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘बिद्री’त ‘के. पी.’च ‘लई भारी’--चंद्रकांतदादा-मुश्रीफ ठरले किंगमेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:31 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

ठळक मुद्देसर्व २१ जागांवर दणदणीत विजयदिनकरराव जाधव-आबिटकर-मंडलिक आघाडीचा धुव्वार्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कदत्ता लोकरेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑवादी-भाजप आघाडीने सर्व २१ जागा मोठ्या फरकाने जिंकून दणदणीत विजय मिळविला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडाला. सर्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी झाले.

राज्याच्या राजकारणात ज्या राष्ट्रवादीचा ‘भ्रष्टाचारवादी’ असा उल्लेख केला, त्याच पक्षाशी या निवडणुकीत भाजपने आघाडी केली होती; त्यामुळे हा नवाच फॉर्म्युला लोक कितपत स्वीकारतात याबद्दल उत्सुकता होती. सभासदांनी त्यावरून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून याच आघाडीस स्पष्ट बहुमत दिले. ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पदरी पराभव आल्याने भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच जागा घेऊन राष्टÑवादीसोबत निवडणूक लढविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. महसूलमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांनी या निवडणुकीत व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लावली होती.

विरोधी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कारखान्यातील कारभारावर टीका केलीच; त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा यांना विधानसभा लढविण्याचे जाहीर आव्हान देऊन निवडणुकीत चांगलीच हवा तयार केली होती. त्यामुळे त्यांना चार-पाच तरी जागा मिळतील असे चित्र होते; परंतु त्यांच्या आघाडीस दारुण पराभवास सामोरे जावे लागले. प्रमुख विजयी उमेदवारांत माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विठ्ठलराव खोराटे, बाबासाहेब हिंदुराव पाटील यांचा समावेश आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अपात्र सभासदांचा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

कारखान्याच्या वाढीव सभासदांचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासक नेमला होता. गेली दोन वर्षे कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासक नेमणुकीवरून भाजप व राष्टÑवादीमध्ये वाद झाला होता; परंतु हे दोन पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येऊन सत्ता काबीज केली. के. पी. पाटील यांच्या कारखाना चांगला चालविण्याच्या प्रतिमेचा फायदा या निवडणुकीत राष्टÑवादी-भाजप आघाडीला झाला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी रात्री दहा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. ८) चुरशीने ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदान झाले होते. मंगळवारी लोणार वसाहतीतील रामकृष्ण हॉल मध्ये मतमोजणी झाली.गत निवडणुकीपेक्षा मताधिक्यात घटगत निवडणुकीत राष्टÑवादीने स्वबळावर सर्व जागा जिंकत पाच ते सहा हजारांचे मताधिक्य घेतले होते. या वेळेला वाढीव सभासद असूनही त्यात घट झाली. विरोधी आघाडीने केलेली मोर्चेबांधणी, राष्टÑवादी आघाडीतून ऐनवेळी बाजूला गेलेले विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, जीवन पाटील, अशोक फराकटे, राजेखान जमादार यांच्यामुळे हा फटका बसला.भाजप पहिल्यादांच ‘बिद्री’च्या सत्तेतविजयी आघाडीत भाजपचे पाच संचालक आहेत. यांमध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार बजरंग देसाई यांचे प्रत्येकी दोन, तर जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे असे संचालक आहेत. या संचालकांच्या माध्यमातून भाजप ‘बिद्री’च्या सत्तेत पहिल्यांदाच गेला आहे.संस्था गटाची विजयी सलामीसंस्था गटातील मतमोजणी सुरुवातीला घेण्यात आली. यामध्ये १०३६ पैकी १०३६ मते वैध ठरली. त्यांपैकी महालक्ष्मी आघाडीचे जगदीश पाटील यांना ५४२, तर राजर्षी शाहू आघाडीचे जीवन पाटील यांना ४९० मते मिळाली. संस्था गटातील निकालाने ‘महालक्ष्मी’ आघाडीने विजयी सलामी दिली.निवडणूक यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरीगत निवडणुकीत दुसºया दिवशी सकाळी आठपर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते. या निवडणुकीत मतदानात वाढ झाल्याने त्यापेक्षा जादा वेळ लागेल, असा अंदाज होता; पण निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केल्याने रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही गोंधळ, गडबड व तक्रारी न होता सर्व निकाल जाहीर झाला.