शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘बिद्री’त दादा, मुश्रीफ, के. पी. यांची गट्टी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ‘गट्टी’ जमल्याचे समजते. गुरुवारी सकाळी त्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलणी झाली आहेत. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व राहुल देसाई हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ‘गट्टी’ जमल्याचे समजते. गुरुवारी सकाळी त्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलणी झाली आहेत. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व राहुल देसाई हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाजप-राष्ट्रवादी युती’चा नवा पॅटर्न आकार घेऊ लागला आहे.बिद्री साखर कारखान्यात आता गेली दीड वर्षे प्रशासक मंडळ अस्तित्वात आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्याने तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच हे मंडळ नियुक्त केले आहे. त्यांनी हा कारखाना उत्तम पद्धतीने चालविला आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच कारभार असू दे, अशाही भावना सभासदांतून मध्यंतरी व्यक्त झाल्या; परंतु आता कारखान्यास निवडणुकीचे वेध लागले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. के. पी. पाटील यांच्या गटाने केलेले वाढीव ९८२० सभासद अपात्र ठरविले व ४७०२ मतदारांना पात्र ठरविले आहे. आॅक्टोबरमध्ये निवडणुकीचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.आताच्या राजकारणात तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव, विजय मोरे, संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांचे पॅनेल होणार हे नक्की आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांना तिथे कोणत्याही स्थितीत भाजपचा सत्तेत शिरकाव हवा आहे. कदाचित पालकमंत्री पाटील हे आगामी विधानसभेला राधानगरी-भुदरगड या मतदारसंघातील उमेदवारही असू शकतात तशी चर्चाही विविध व्यासपीठांवरून अधून-मधून सुरू आहे. भाजपचे त्या तालुक्यात अजूनही म्हणावे तेवढे मजबूत संघटन नाही. त्यामुळे हा पक्ष स्वबळावर रिंगणात उतरू शकत नाही. त्या पक्षाच्या त्या मर्यादा आहेत. विरोधी आमदार आबिटकर यांच्याशीही पालकमंत्र्यांचे फारसे जमत नाही शिवाय संजय मंडलिक यांनाही सोबत घेणे ‘दादां’ना अडचणीचे आहे. कारण अगोदरच त्यांनी महाडिक गटाला राजकीय सोबतीला घेतले आहे. अशा स्थितीत ‘सोयीची युती’ म्हणून हा नवा घरोबा आकारास येत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कुणी कोणत्या पक्षाबरोबर युती करावी याला काय बंधन नसते, असेही कारण त्यासाठी पुरेसे आहेच.भाजपची राष्टÑवादीबरोबरआघाडी शक्यकागल तालुक्यातील समरजित घाटगे भाजपवासी झाल्यामुळे त्यांना काही जागा द्याव्याच लागतील. शिवाय गतनिवडणुकीत विरोधी असलेला माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगाच राहुल सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे सहा-सात जागा पदरात पाडून घेऊन भाजप तिथे राष्ट्रवादीसोबत आघाडी करू शकतो. या कारखान्याचा अध्यक्ष भाजप ठरवेल, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेत जाऊन दादा दबावगट म्हणूनही कारखान्यावर नियंत्रण ठेवू शकतात.