शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भेंडवडे गाव जिल्ह्यात पुनर्वसनाचे मॉडेल ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : भेंडवडे येथील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या अगोदर पुनर्वसित ठिकाणी हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : भेंडवडे येथील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या अगोदर पुनर्वसित ठिकाणी हे लोक राहायला जातील, अशी व्यवस्था करण्यात येईल. या संदर्भातील आराखडा दोन महिन्यात तयार होईल. भेंडवडे हे गाव जिल्ह्यातील पुनर्वसनाचे मॉडेल ठरेल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

भेंडवडे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. आमदार राजू आवळे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान खोची, बुवाचे वाठार येथील पूरग्रस्त भागाची पाहणीही केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जुने घर सोडणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. गायरान जमिनीवर भूखंडाचे नियोजन करून तिथे विविध योजनेतून घरे बांधून ती नावावर केली जातील. पूरग्रस्तांची नुकसान भरपाई ही त्यांच्या बँक खात्यावर शासन जमा करणार आहे. १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो तूर डाळ व ५लिटर रॉकेल वाटपाचे काम सुरू झाले आहे.’’

यावेळी नुकसान भरपाईचे पंचनामे व्यवस्थित करून पात्र असणारे कोणीही वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्या. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घरे, शेती यांची माहिती घ्या, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सर्जेराव माने यांनी पूरग्रस्तांच्या अडचणींची माहिती दिली. यावेळी सरपंच काकासो चव्हाण, अभिजित माने, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, बाळासाहेब माने, कृष्णात वासुदेव, हर्षवर्धन चव्हाण, सचिन चव्हाण, कपिल पाटील, भगवान जाधव, डॉ.विजय गोरड, एस.एम.पाटील, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार प्रताप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, मंडल अधिकारी गणेश बर्गे आदी उपस्थित होते.

खोची येथील पूरग्रस्तांनी पालकमंत्री पाटील यांना गायरानातील भूखंड मिळावेत, अशी मागणी केली. खोची दूधगाव पुलाच्या भरावामुळे पाण्याची फूग वाढून मोठे नुकसान झाले आहे. तो भराव काढून कमान पद्धत करावी, अशी मागणी केली.

यावेळी सरपंच जगदीश पाटील, एम.के.चव्हाण, अजय पाटील, सुशेनराव शिंदे, भैरवनाथ पवार, प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बुवाचे वाठार येथे सरपंच रीना शिंदे, उपसरपंच शंकरराव शिंदे, मदन अनुसे आदी उपस्थित होते.

३१ भेंडवडे सतेज पाटील

फोटो ओळी-भेंडवडे येथे पूरग्रस्त पाहणीवेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजू आवळे, काकासो चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, प्रदीप उबाळे, सर्जेराव माने, अभिजित माने उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)