शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भवानी मंडप लवकरच ट्रॅफिकमुक्त

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

‘नो पार्किंग झोन’ करणार : मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात पर्यायी व्यवस्था

कोल्हापूर : केएमटी थांबा हटविल्यानंतर दुचाकींमुळे सौंदर्य हरवलेला भवानी मंडप परिसर आता वर्दळीपासून मुक्त होणार आहे. पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद आणि छत्रपती देवस्थान ट्रस्टने दिलेल्या सहकार्यामुळे हा परिसर ‘नो पार्किंग झोन’ करून मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. भवानी मंडप परिसर म्हणजे, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा वारसा, भवानी मंडप कमान, जुना राजवाडा, तुळजाभवानी मंदिर आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर ही प्रमुख स्थळे याठिकाणी आहेत. परिसरातील लगबग आणि अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर येथील केएमटी थांबा खासबाग येथे हलविण्यात आला. त्यामुळे परिसरातील वर्दळ कमी झाली असली, तरी त्याची जागा दुचाकी पार्किंगने आणि फिरत्या विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसराला अतिशय ओंगळवाणे स्वरूप आले आहे.पूर्वी केएमटी बसस्टॉप मागे मैदानात जाण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र, नंतर त्यासमोर भिंत बांधून मैदान सुरक्षित करण्यात आले. ही भिंत उतरवून मैदान पार्किंगसाठी देण्यात यावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाने केली होती. या प्रस्तावाला जिल्हा परिषद आणि छत्रपती देवस्थान ट्रस्टने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न निकाली लागणार आहे.भवानी मंडप परिसर छत्रपती देवस्थान ट्रस्टचा असला, तरी केवळ नागरिकांच्या सोयीसाठी तो नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आला. हा परिसर सुशोभित व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे; पण फक्त ‘नो पार्किंग’ करून न थांबता येथील टपऱ्या, गाळे अन्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.- युवराज संभाजीराजेभवानी मंडप हा सगळा परिसर हेरिटेज वास्तूंमध्ये येतो. या ऐतिहासिक इमारतींचे सौंदर्य मात्र विविध प्रकारच्या जाहिराती, टपऱ्या, लहान-मोठे दुकान गाळे, फिरते विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, रस्त्यावर बसलेले साहित्य विक्रेते यामुळे झाकोळले गेले आहे. हे सौंदर्य पुन्हा प्रकाशात आणण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे.