शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब सूर्यवंशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST

इचलकरंजी : येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार भाऊसाहेब बाबू सूर्यवंशी (वय ...

इचलकरंजी : येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार भाऊसाहेब बाबू सूर्यवंशी (वय ८५) यांचे चंदूर (ता. हातकणंगले) येथील शाहूनगरमध्ये राहत्या घरी मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अंत्यसंस्कारावेळी झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी सूर्यवंशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शहरात संघटना उभारून जिल्हा व राज्य संघटनेच्या बांधणीसाठी बहुमोल योगदान दिले.

अंत्यसंस्कारावेळी पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत, पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव अण्णा गुंडे, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सांगली वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मारुती नवलाई, कम्युनिस्ट पक्षाचे दत्ता माने, सदा मलाबादे, प्रसाद कुलकर्णी, आप्पा पाटील, आदींसह विक्रेते उपस्थित होते. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता पंचगंगा नदीघाटावर आहे.

फोटो ओळी

०६०४२०२१-आयसीएच-०१ - भाऊसाहेब सूर्यवंशी