शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भारती हाळवणकरांची उमेदवारी शक्य !

By admin | Updated: July 18, 2014 23:24 IST

इचलकरंजी विधानसभा : मेघा चाळके, हिंदुराव शेळकेंच्या नावांचा बोलबाला

राजाराम पाटील - इचलकरंजी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द आणि वीज चोरी प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी भारती हाळवणकर यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. तसेच माजी नगराध्यक्षा मेघा चाळके व हिंदुराव शेळके यांचीही नावे पुढे आहेत. हाळवणकर यांना दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याबरोबर त्यांना सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. परिणामी हाळवणकर यांच्या पश्चात आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण, या चर्चेला उधाण आले आहे. हाळवणकर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मे महिन्यातील कोल्हापूर येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, वीज चोरी प्रकरणात आमदार हाळवणकर यांना गोवण्यात आले असून, त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे षड्यंत्र आहे, अशी टीका झाली होती. तसेच हाळवणकर यांच्या पाठीशी भाजप असल्याची ग्वाही काही वक्त्यांनी दिली होती. आमदार हाळवणकर यांना झालेली शिक्षा, त्यांचे गेलेले विधानसभा सदस्यत्व आणि त्यांना विधानसभा निवडणूक लढविता न येणे, याला भाजपने भावनिक रंग दिला आहे. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांना निवडणूक लढविता आली नाही तर त्यांच्या पत्नी भारती सुरेश हाळवणकर यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यांच्याबरोबर माजी नगराध्यक्षा मेघा सागर चाळके यांचेही नाव चर्चेत आहे. नगराध्यक्षा व नगरपालिकेत केलेल्या कामगिरीची नोंद घेतली जाईल, असेही जाणकारांचे मत आहे. तसेच भाजपतून माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके व कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांच्याही उमेदवारीचा बोलबाला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय कॉँग्रेसच्या वाट्याचा असल्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा मागील आठवड्यात शहर कॉँग्रेसच्या मेळाव्यात झाली आहे, तर दोन्ही कॉँग्रेसमधील बेबनाव पाहता ‘राष्ट्रवादी’कडून मदन कारंडे व माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्याही उमेदवारीची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मात्र कामगार नेते दत्तात्रय माने यांचे नाव पुढे येत आहे.