शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भापकर गुरुजींना कोल्हापूरची साथ

By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST

पंचावन्न हजार जमा : शासनाचा निधी न घेता स्वत:च केला रस्ता

कोल्हापूर : गावकऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी डोंगर फोडून रस्ता बनविणाऱ्या नगरजवळील गुंडेगावच्या ८४ वर्षाच्या राजाराम भापकर गुरुजींच्या कार्याला सलाम करत कोल्हापूरकरांनी जमवलेले ५५ हजार रुपये शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडे सुपूर्द केले. पुढील महिन्यात सन्मानपूर्वक हा निधी गुरुजींना दिला जाईल. नगरजवळील गुंडेगाव या गावातून कोळगाव या बाजारपेठेच्या जागी जाण्यासाठी वाहन असलेल्या नागरिकांना ३५ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागे. अन्य लोकांना मात्र डोंगरावरील दरडी, ओढे, नाले पार करत कोळगाव गाठावे लागे. हे पाहून भापकर गुरुजींनी डोंगरावरील घाटरस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. पदरी निराशा आल्यानंतर त्यांनी स्वत:च रस्ता बनवायला सुरुवात केली. आपल्या ६० रुपये पगारातली अर्धी रक्कम आणि निवृत्तिवेतनाची रक्कम या कामासाठी देत त्यांनी ४० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर गुंडेगाव ते कोळगाव तसेच ७ किलोमीटरचा घाटरस्ता बांधून पूर्ण केला. संतोषा डोंगर घाटाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या धावडेवाडीत व गुंडेगावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठीचा २६ किलोमीटरचा रस्ता त्यांनी सरकारी मदत न घेता पूर्ण केला. त्यांच्या या कार्याची माहिती शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून भापकर गुरुजींसाठी निधी जमा केला. मंगळवारी (दि. २७) हा निधी भापकर गुरुजींना सन्मानपूर्वक देण्यात येणार होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापूरला येऊ शकले नाही. त्यामुळे जमलेला ५५ हजारांचा निधी डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडे सुपूर्द केला.