शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या नगराध्यक्षपदी भांदिगरे

By admin | Updated: April 28, 2016 00:59 IST

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे होते.

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील नगराध्यक्षपदी पाटील गटाच्या नम्रता नामदेव भांदिगरे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रेखा सुधीर सावर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदावर निवड करण्यासाठी पालिकेच्या सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे होते. मुरगूड नगर परिषदेवर पाटील गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी मागास वर्गीय महिलेसाठी आरक्षण पडल्याने या प्रवर्गातील फुलाबाई कांबळे व गौराबाई सोनुले यांना प्रत्येकी सव्वा वर्ष नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित अडीच वर्षांसाठी पुन्हा खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षण पडले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी या प्रवर्गातील सर्व महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम माया चौगले, वसुधा कुंभार, रेखा सावर्डेकर यांना प्रत्येकी सात-सात महिने काम करण्याची संधी दिली. ठरलेल्या फार्मुल्यानुसार या प्रवर्गातील नम्रता भांदिगरे यांना राहिलेल्या कालावधीसाठी संधी मिळणार होती. त्यानुसार नेत्यांच्या आदेशान्वये पाटील गटाच्या नम्रता नामदेव भांदिगरे यांनी या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार सांगडे यांनी जाहीर करताच भांदिगरे समर्थक व पाटील गटाच्या समर्थकांनी डॉल्बी लावून, गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात आनंद साजरा केला. यावेळी नूतन नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे यांचा माजी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर, संतोष वंडकर, नामदेव भांदिगरे, माया चौगले, वसुधा कुंभार, फुलाबाई कांबळे, गौराबाई सोनुले, दगडू शेणवी, शिवाजी इंदलकर, बजरंग सोनुले, सुनील चौगले, सुधीर सावर्डेकर, जगन्नाथ पुजारी, बटू जाधव, मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, अमर कांबळे, रणजित निंबाळकर, दिलीप कांबळे, आदी प्रमुख उपस्थित होते.