शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीमंडई, बाजारपेठेत शुकशुकाट; रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:15 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. बहुतांश चौक ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. बहुतांश चौक आणि रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याने ते ओस पडले होते.कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत अत्यंत अटीतटीची लढत होत आहे; त्यामुळे प्रचारदेखील तितकाच चुरशीने झाला. तितकीच चुरस मंगळवारी मतदानावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये दिसून आली. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी शासनाने दिल्याने उपनगर, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरात नोकरी, रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या तुरळक होती. तापमानाचा पारा अधिक असल्याने अनेकांनी दुपारी दोनपूर्वी मतदान करण्याला पसंती दिली. बहुतांश जणांनी मतदान करणे आणि त्यानंतर घरी थांबण्याला प्राधान्य दिले; त्यामुळे मंगळवारी बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, गुजरी परिसर, पापाची तिकटी, गंगावेश, मनपा चौक, बाजारगेट परिसरात शुकशुकाट दिसून आला. अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, महाद्वार रोड, ताराबाई रोड परिसरात बाहेरून आलेले भाविक दिसून आले. बहुतांश व्यावसायिकांनी कामगारांना सुट्टी दिल्याने दुकाने बंद ठेवली. रस्त्यांवर वर्दळ कमी होती. दुपारी दीडनंतर उन्हाचा पारा कमी होईपर्यंत रस्ते, चौक ओस पडले होते. केएमटी निवडणुकीचे साहित्य नेण्यासाठी वापरल्याने त्यांच्या फेºया कमी होत्या. रस्त्यांवर रिक्षांची संख्या कमी दिसली. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर रस्ते, चौकातील वर्दळ हळूहळू वाढू लागली.सायंकाळनंतर गर्दीमतदान केल्यानंतर आणि उन्हाचा पारा कमी झाल्याने सायंकाळी साडेसहानंतर अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, पदपथ उद्यानातील गर्दी वाढली. काहींनी मतदान झाल्याने आणि सुट्टी असल्याने चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली.