शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजीत भाजी अंबाडी, सरकार करतंय लबाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सोमवारपासून संप सुरू केला. राज्यभर आंदोलन सुरू झाले असून सोमवारी दुपारी हजारो कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आक्रमक घोषणा देत या मदतनीस आणि सेविकांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने दुपारी १२ वाजता मोर्चाला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सोमवारपासून संप सुरू केला. राज्यभर आंदोलन सुरू झाले असून सोमवारी दुपारी हजारो कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आक्रमक घोषणा देत या मदतनीस आणि सेविकांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. एकापेक्षा एक घोषणा देत मोर्चा दुपारी एकच्या सुमारास जिल्हा परिषदेवर धडकला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय’, ‘भाजीत भाजी अंबाडी, पंकजा मुंडे,सरकार करतंय लबाडी’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा,’ अशा घोषणा दिल्या.थोड्या वेळाने कॉ. सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली छाया तुप्पट, कुसूम पोवार, शोभा धुमाळ, संगीता पोवार, भारती पाटील, आशा तावरे, कल्पना पिलारे, सुनंदा किल्लेदार, उषा कांबळे, शुक्रा पाटील, कल्पना गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते यांची भेट घेतली. त्यांच्याशी यावेळी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. या चर्चेचा तपशील आणि मंगळवारी मुंबई येथे होणाºया आझाद मैदानावरील आंदोलनाबाबतच्या सूचना दिल्यानंतर मोर्चा संपला.इतर राज्यांना जमतं तर महाराष्ट्राला का नाही?अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मानधन वाढ करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी मानधनात वाढ केली. मात्र, पुरोगामी आणि अग्रेसर म्हणवून घेणाºया महाराष्ट्राने मानधनवाढीचा निर्णय घेतला नाही. गेली वर्षभर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची त्यांच्या गावी, विधान भवनामध्ये, मंत्रालयामध्ये भेटी घेण्यात आल्या. ३० मार्च २०१७ रोजी मुंडे यांनी विधान भवनात झालेल्या बैठकीत एक महिन्यात मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडून मंजूर करून घेऊन मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी संघटनांना आश्वासन दिले होते.२५ जुलैला आझाद मैदानात मोर्चेकºयांसमोर येऊन पुन्हा एक आठवड्याचे आश्वासन दिले होते; परंतु तेही त्यांनी न पाळल्याने एक महिन्यापूर्वी ‘बेमुदत बंद’ची नोटीस देण्यात आली होती.शासकीय कर्मचाºयांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभमिळावेत.मानधन वाढ करून ती १ एप्रिल २०१६ पासून लागू करावी.मानधन, प्रवास व बैठक भत्ता दर महिन्याला मिळावा.आहार अनुदान, इंधन भत्ता दर महिन्याला मिळावा.सादिलची रक्कम वाढवून६ हजार रुपये करावी. (मोबाईलवरून डाटा, फोटो पाठवावे लागतात. यासाठी नेट पॅक मारावा लागतो म्हणून.)आवश्यक नोंदवह्या शासनाने पुरवाव्यात.यासह अन्य १३ मागण्या करण्यात आल्या आहेत.