अधिक माहिती अशी, स्वरा ही वडील डॉ. नीलेश अमृत गोडसे (रा. भादवण, ता. आजरा) येथे धरणावर गेली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. वडील गोडसेही सोबत पाण्यात होते. स्वरा बुडणार हे लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड सुरू केली.
दरम्यान, यावेळी धरण परिसरात असणारे दत्तात्रय यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता तिला वाचविण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेऊन तिचे प्राण वाचविले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय दगडाला लागून गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी महागाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
--------------------------
फोटो ओळी :
भादवण (ता. आजरा) येथील धरणात बुडणाऱ्या स्वरा गोडसे हिला वाचविताना जखमी झालेले दत्तात्रय खुळे.
क्रमांक : ०२०४२०२१-गड-१६