शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा भवन’साठी सर्वोतोपरी प्रयत्न

By admin | Updated: December 31, 2016 01:10 IST

महापौर : मराठा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा; मुंबईतील मोर्चासाठी एक लाख मराठा जाणार : मुळीक

कोल्हापूर : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मराठा महासंघ अग्रभागी आहे. त्यांच्या पुढाकाराने नियोजित असलेले ‘मराठा भवन’चे काम आपल्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर हसिना फरास यांनी शुक्रवारी येथे दिली. याचवेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी कोल्हापुरातून एक लाख मराठा जाणार, असे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघातर्फे मराठा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती उपमहापौर अर्जुन माने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, नियाज खान, बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, शाहू स्मारक ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे, क्षत्रिय मराठा चेंबर्सचे अध्यक्ष विक्रांतसिंह कदम, महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आदींची होती.यावेळी महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते ‘मराठा दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले. महापौर म्हणाल्या, मराठा दिनदर्शिका प्रकाशनाचा उपक्रम कौतुकास्पद असून, त्यासाठी शुभेच्छा आहेत. कोल्हापूर ही मराठ्यांची, पराक्रमी शिव-शाहूंच्या विचारांची भूमी आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मराठा महासंघ अग्रभागी आहे. त्यांच्या पुढाकाराने होत असलेल्या नियोजित मराठा भवनासाठी आपल्या कारकिर्दीत सर्वतोपरी प्रयत्न करू.वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मूक मोर्चे काढण्यात आले; परंतु एवढ्यावरच भागणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईतील मोर्चात कोल्हापूर अग्रभागी राहणार असून, यासाठी किमान एक लाख मराठा जातील. या ठिकाणीही जर न्याय मिळाला नाही तर शांततेच्या मार्गाने ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल.प्रा. जयंत पाटील, संभाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. एकनाथ जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संदीप पाटील, उत्तम जाधव, डॉ. शिवाजीराव हिलगे, अजित राऊत, नितीन सावंत, अवधूत पाटील, मनोज नरके, मिलिंद ढवळे, आदी उपस्थित होते.शहीद उलपे यांच्या मातोश्री झाल्या भावनिकप्रकाशन सोहळ्यात पहिली दिनदर्शिका कसबा बावड्यातील शहीद जवान दिगंबर उलपे यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या मातोश्री आनंदी उलपे यांना व्यासपीठावर बोलाविण्यात आले. यानिमित्ताने शहीद जवान पुत्राच्या पराक्रमी आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून त्या काहीकाळ भावनिक झाल्या.