शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या ममतादीदीची एकहाती संघर्ष यात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:27 IST

वसंत भोसले ‘मा, माटी, मानुश’ या घोषवाक्यासह बंगाली माणसांची अस्मिता २०११ जागृत करून, अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता ...

वसंत भोसले‘मा, माटी, मानुश’ या घोषवाक्यासह बंगाली माणसांची अस्मिता २०११ जागृत करून, अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भारतीय राजकारणात इतिहास रचला. लोकशाही मार्गाने सलग ३४ चौतीस वर्षे सत्तेवर राहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कम्युनिस्टांचा पराभव त्यांनी केला. त्यांचा हा संघर्ष साधा नव्हता. बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला पराभूत करण्याचे कॉँग्रेससह सर्व पक्षांचे प्रयत्न संपले होते. सलग सहा निवडणुका जिंकणाºया डाव्या आघाडीचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होण्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. २९ वर्षांच्या तरुण ममता बॅनर्जी यांनी १९८४ मध्ये कॉँग्रेसतर्फे लोकसभेची पहिल्यांदा जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बॅ. सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता. मात्र १९८९ मध्ये त्या पराभूत झाल्या. त्यामुळे १९९१ मध्ये त्यांनी दक्षिण कोलकत्तामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि विजयही मिळवला. तेव्हापासून सलग सहावेळा त्या विजयी झाल्या. मात्र, राज्यात व विधानसभा निवडणुकीत माकपशी कॉँग्रेस संघर्ष करीत नव्हता. पर्याय देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा १९९८ मध्ये स्वपक्षाशीच संघर्ष सुरू झाला. अखेरीस त्यांनी कॉँग्रेसचा त्याग केला आणि १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केली. देशात १९९८ ते २००९ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या सात निवडणुका झाल्या. डाव्या आघाडी लढताना तृणमूल कॉँग्रेसच्या पदरी पराभवच पडत होता. २००७ मध्ये डाव्या सरकारने सिंगूर आणि नंदीग्राममध्ये सेझ निर्माण करून औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार होता. त्यांच्या पाठीशी ममतांनी उभे राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही प्रकल्प रद्द करावे लागले. त्या आंदोलनात अनेक शेतकरी मारले गेले.मध्यंतरीच्या काळात ममता बॅनर्जी यांनी भाजपशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांचा समावेशही झाला. त्या आघाडीतही संघर्ष झाला. त्यांनी २०११ ची विधानसभा निवडणूक कॉँग्रेसशी आघाडी करून लढविली आणि २९४ पैकी १८४ जागा जिंकून डाव्या आघाडीचा पराभव केला. २० मे २०११ रोजी त्यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. उत्तम कवयित्री आणि चित्रकार असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. साधी सुती साडी आणि पायात स्लिपर्स घालूनच त्या वावरतात. त्यांनी आजवर काढलेल्या ३०० चित्रांपैकी काहींची विक्री झाली आणि त्यातून दहा कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. त्यांनी २०११ मध्ये ‘मा, माटी मानुष’ ही घोषणा देऊन बंगाली अस्मिता जागृत केली होती. त्यांनी ‘जागो बांगला’ वृत्तपत्रही चालविले आहे. बंगाली अस्मितेच्या आधारे एक नवी राजकीय संस्कृती त्यांनी निर्माण केली. कॉँग्रेस ते तृणमूल कॉँग्रेस, भाजप आघाडी ते कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी असा प्रवास करीत त्यांनी सर्वांशी संघर्ष केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएशी काडीमोड घेतला. आज विधानसभेत प्रचंड बहुमताने त्यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे. तरीही पक्षाचे खरे बळ पश्चिम बंगालमध्ये आहे. आज विधानसभा आणि लोकसभेबरोबर स्थानिक संस्थांमध्ये तृणमूल कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ममता बॅनजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध करतात. भाजपने बंगालमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत एकेकाळी डाव्या आघाडीचा बालेकिल्ला तृणमूलच्या हाती गेलेला त्यांच्याच हाती सुरक्षित राहणार का? याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. त्यासाठीही आता ममतादीदींचा संघर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चालू आहे. संघर्षमय जीवनाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या हे बंगाली अस्मितेचे राजकारण आहे.उद्याच्या अंकात : उत्तरेतील बहुजन समाजाचा पक्ष