शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

डिजिटल पेमेंट व्यापाऱ्यांना फायदेशीर : खंडेलवाल

By admin | Updated: January 11, 2017 00:45 IST

व्यापाऱ्यांची परिषद : कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे आयोजन

कोल्हापूर : पुढील काळातील आव्हाने ओळखून ‘डिजिटल पेमेंट’ या संकल्पनेचा जास्तीत जास्त वापर करा. जी.एस.टी. हा डिजिटल पेमेंटचाच एक भाग असल्याचे मत, कन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (क ॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी कोल्हापुरात व्यक्त केले.ते दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित ‘अर्थव्यवस्थेतील बदलाचा व्यापार-उद्योगावरील परिणाम’ या विषयावरील परिषदेत बोलत होते. यावेळी दि आॅल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील व ‘फिक्की’चे संचालक ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवन येथे ही परिषद झाली.प्रवीण खंडेलवाल म्हणाले, आजच्या स्थितीत व्यापाऱ्यांना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे पुढील काळात व्यापारवृद्धीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता के्रडिट, डेबिट, एन.एफ.टी. आणि आर.टी.जी.एस. करावे लागणार आहे. हा डिजिटल पेमेंटचा भाग आहे. त्याचबरोबर रोख स्वरूपात, धनादेशचे (चेक) व्यवहार यापुढे चालणार नाहीत. डिजिटल पेमेंटमुळे एनएफटी व आरटीजीएस या माध्यमांतून सरकारचा परतावा व्यापाऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा महसूलमध्ये वाढ होऊन गुणांकन मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची व्यापाऱ्यांनी कास धरावी.आनंद माने म्हणाले, नोटाबंदीमुळे व्यवसायाचे वातावरण मारक झाले आहे. तसेच आॅनलाईन, एफडीए, मॉल अशा स्पर्धेमुळे छोट्या व्यावसायिकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावेळी जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल करणे जरुरीचे आहे, अशी माहिती टॅली सॉफ्टवेअरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.फेडरेशनचे अध्यक्ष दीपक शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी आनंद माने, धनंजय दुग्गे, संजय शेटे, संजय पाटील, शिवाजी पोवार, नयन प्रसादे यांचा खंडेलवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धैर्यशील पाटील, ललित गांधी यांची भाषणे झाली. सचिव प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.विमानतळ विकसित होणे गरजेचेकोल्हापूरचा विमानतळ विकसित होणे हे येथील व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तो विकसित झाल्यास विकासाला आणखी चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मत प्रवीण खंडेलवाल यांनी यावेळी व्यक्त केले. दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन व कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मंगळवारी कन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी शाहू स्मारक भवनात मार्गदर्शन केले. यावेळी संजयकुमार पाटील, विजय नारायणपुरे, दीपक शहा, ललित गांधी, धैर्यशील पाटील, आनंद माने, प्रशांत शिंदे, अतुल दोशी, प्रदीपभाई कापडिया उपस्थित होते.