शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बेनझीर व्हिला होणार पर्यटनस्थळ

By admin | Updated: December 21, 2016 22:28 IST

आराखड्याचे काम सुरू : पर्यटन व्यवसाय वाढीला मोठी मदत होणार

संजय पारकर -- राधानगरी धरणातील शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या बेनझीर व्हिलाचे व हत्तीमहाल येथील वास्तूचे लवकरच पर्यटनस्थळात रूपांतर होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या सूचनेनुसार याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. बेनझीर व्हिलाची दुरुस्ती, परिसर सुशोभिकरण करून तेथे जाण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने होणाऱ्या शाहूंच्या स्मारक केंद्राची जागा निश्चित झाली आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर येथे पर्यटन व्यवसाय वाढीला मदत होणार आहे.शाहू महाराजांनी आपल्या कायर्काळात या परिसरात अनेक वास्तू उभारल्या. धरण उभारणी काळात या कामावर देखरेख ठेवण्यासाठी येणाऱ्या तज्ञांसाठी एका टेकडीवर हा बेनझीर बंगला बांधला होता. ते स्वत:ही येथे काहीवेळा वास्तव्यास असत. धरणात पाणी संचय झाल्यावर टेकडीच्या सभोवती पाण्यामुळे या टेकडीला बेटाचे स्वरूप येते. धरण पूर्ण झाल्यावर या वास्तूकडे दुर्लक्ष झाले. उन्हाळ्यात धरण पूर्ण रिकामे झाले तरच येथे जाता येते. त्यामुळे येथे फारसे कोणी फिरकत नाही. गेल्या वर्षी ही संधी मिळाली. प्रसार माध्यमातून याची माहिती मिळाल्यावर येथे पर्यटकांची रीघ लागली होती.अनेक वर्षे ही वास्तू देखभाली अभावी उन-पावसाचा मारा सहन करीत उभी आहे. दगडी बांधकाम भक्कम असले तरी प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती कण्याची मागणी लोकांकडून होत होती. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या परिसराची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यांनी यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने याचा आराखडा करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी सुमारे दीड कोटी खर्च येईल असा अंदाज आहे.१ बेनझीर बंगल्याचे सुशोभिकरण व बोटिंगची सुविधा झाल्यावर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ते जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या कोल्हापुरातील राजर्र्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट कडे देण्यात येणार आहे.२ धरण परिसरात कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत शाहू महाराज स्मारक व माहिती केंद्र होणार आहे. यासाठी जागेचा प्रश्न होता. तो मार्र्गी लागला आहे.महाजनकोच्या वीजनिर्मिर्ती केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पश्चिम बाजूची जागा यासाठी निश्चित केली आहे.३ धरणावर खासगी तत्त्वावर जलविद्युतनिर्मिर्ती केंद्राचे काम करताना या कंपनीने धरणाच्या आतील बाजूला, पाटबंधारेच्या विश्रामगृह परिसरात विश्रामगृह बांधले होते. तक्रार झाल्यावर ते बांधकाम अर्धवट राहिले. ही इमारत पाटबंधारे विभागाने ताब्यात घेतली आहे. तेथे काही सुधारणा करून त्याचा वापर आता शासकीय प्रशिक्षण केंद्र व बैठका यासाठी करण्यात येणार आहे.