शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या मोर्चाला कोल्हापूरकर जाणार

By admin | Updated: February 13, 2017 00:20 IST

महापौरांचे सहभागी होण्याचे आश्वासन : क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी घेतल्या शहरातील नेत्यांच्या भेटी

कोल्हापूर : बेळगाव येथे होणाऱ्या सकल मराठा व मराठी मूक मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही सकल मराठा समाजाच्या वतीने सहभागी व्हावे यासाठी मोर्चाच्या निमंत्रकांनी रविवारी कोल्हापुरात शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे, आदी नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना आवाहन केले. या मोर्चात कार्यकर्त्यांसह आपण स्वत: मोर्चात सहभागी होणार असल्याचे महापौर हसिना फरास यांनी आश्वासन दिले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी दिले.सकल मराठा व मराठी समाजाच्या वतीने बेळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे निमंत्रक, बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, नेताजी जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, मोर्चाचे जनसंपर्क अधिकारी विकास कलघटकी यांनी रविवारी शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सीमावादाबाबतचे महाराष्ट्र शासनाचे समन्वयक चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या दडपशाहीबाबत केंद्राला भूमिका कळवावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोन करून चर्चा केली. या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्यांनीही मोर्चात कार्यकर्ते सहभागी होतील; तसेच आपणही या मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महापौर हसिना फरास यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरसेविका व कार्यकर्त्यांसह आपण स्वत: या मोर्चात सहभागी होऊ, असेही आश्वासन महापौर फरास यांनी दिले. (प्रतिनिधी)सीमावासीयांची इच्छामोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्णातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे.