शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव येथे कारची ट्रकला धडक; औरंगाबादचे सात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:41 IST

बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ...

बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ठार झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहराजवळील महामार्गावर, श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. हे सर्व तरुण गोव्याकडे जात होते.नंदू किशनराव पवार (वय २८), अमोल निले (२६), सुरेश कन्हेरे (२९), अमोल रमेश चावरे (२६), महेश चावरे (२८), महेश नंदू कडाले, गोपीनाथ कडोबा वरकड (वय २७) (सर्वजण रा. औरंगाबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. कारमधील पाच तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत महेश कडाले व गोपीनाथ वरकड या दोघांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.औरंगाबादहून कारमधून सात तरुण गोव्याकडे निघाले होते. रविवारी सकाळी या सर्वांनी कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर हे सर्वजण बेळगावमार्गे गोव्याला जात होते. त्यांची कार बेळगाव येथील श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा कारचा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. ही धडक भीषण असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या दोघांचाही ही मृत्यू झाला.