शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

‘मातृदिना’च्या जागराने धमाल गल्लीची सुरुवात

By admin | Updated: May 11, 2015 01:02 IST

महावीर उद्यानात चौथी धमाल गल्ली उत्साहात : आबालवृद्धांचा वाढता सहभाग; नृत्याविष्कारासह व्यंकटेश स्तोत्र, सतारवादनावर उपस्थित मंत्रमुग्ध

कोल्हापूर : जागतिक मातृदिनाचा जागर करत रविवारी महावीर उद्यान येथे लोकमत आयोजित चौथ्या ‘धमाल गल्ली’ची सुरुवात झाली. दोरीउड्या, पोत्यात पाय घालून धावणे, रस्सीखेच, जिबली सरकवणे, दोरीउड्यांसह ‘आईचं पत्र हरवलं...’ आदी पारंपरिक खेळांत सहभागी होत महिलांसह आबालवृद्धांनी गल्लीत धमाल केली, तर आधुनिक व पारंपरिक संगीतावर नृत्याविष्कारासह, व्यंकटेश स्तोत्र व सतारवादनावर उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कोल्हापुरातील महावीर उद्यान येथे रविवारी सकाळी सात वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून मातृदिनाच्या जागराने ‘लोकमत’ ‘धमाल गल्ली’ची सुरुवात झाली. जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत ‘धमाल गल्ली’त आयोजित विविध उपक्रमांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्यानातील या आल्हाददायक सकाळची सुरुवात व्यासपीठावर वेदा सोनुले व वैदेही जाधव यांच्या व्यंकटेश स्तोत्र पठणाने झाली. स्तोत्राच्या मंगलमय सुरात संपूर्ण उद्यान हरपून गेले. त्यानंतर रस्सीखेच, दोरीउडी, जिबल्या सरकवणे, पोत्यात पाय घालून धावणे, विटी-दांडूसह नृत्याविष्कारात बालचमंूसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गल्लीत लावलेल्या प्रतिक्रिया फलकांवर ‘आई’, ‘स्वप्नपूर्ती’, ‘हॅपी मदर्स डे’, असे संदेश उमटले. महात्मा गांधींच्या वेषात आलेल्या देव सुदर्शन या चिमुकल्याने गांधींजींंच्या विचारसरणींवर आधारित भाषण करून कौतुकाची थाप मिळविली. गल्लीत के. भागर्व, सारंग भोसले व राहुल ढोले यांच्या सतारवादनाने रंगत आली. महावीर उद्यान परिसर हास्यमंचच्या सदस्यांनी निरोगी जीवनाचा मंत्र देत हास्याचे महत्त्व समजावून सांगितले. धमाल गल्लीत प्रेरणा व श्रृती शेटगे या बहिणींनी मायकल जॅक्सनच्या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांना ताल धरायला लावला. समर्थ ठमके या बालकाने शेतकरी गीत सादर केले. पारंपरिक युद्ध प्रात्यक्षिकांसह लाठी-काठी चालविण्याच्या खेळात लहाग्यांचा मोठा सहभाग होता. ७१ वर्षांच्या महादेव चौगले यांनी ‘जाने कहाँ गये वो दिन...’ हे सदाबहार गीत सादर केले. शब्दा सौदलगे, कश्मिरा शहा, पायल माने, आयूब कब्बूर, धनश्री पाटील, श्रृष्टी मोरे व अरुणा मुसळे हिने संमिश्र गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. ‘मल्हार वारी...’ हे गाणे विनायक सासने याने सादर केले. सतीश वडणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व युद्धकलांच्या माध्यमातून उपस्थितांना सुरक्षेचे धडे देण्यात आले. सार्थक क्रिएशन्सच्या पथकाने हिंंदी चित्रपटांतील गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांवर उपस्थित थिरकले. या ‘धमाल गल्ली’चे सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले. (प्रतिनिधी)‘मातृदिना’च्या जागराने धमाल गल्लीची सुरुवात महावीर उद्यानात चौथी धमाल गल्ली उत्साहात : आबालवृद्धांचा वाढता सहभाग; नृत्याविष्कारासह व्यंकटेश स्तोत्र, सतारवादनावर उपस्थित मंत्रमुग्ध कोल्हापूर : जागतिक मातृदिनाचा जागर करत रविवारी महावीर उद्यान येथे लोकमत आयोजित चौथ्या ‘धमाल गल्ली’ची सुरुवात झाली. दोरीउड्या, पोत्यात पाय घालून धावणे, रस्सीखेच, जिबली सरकवणे, दोरीउड्यांसह ‘आईचं पत्र हरवलं...’ आदी पारंपरिक खेळांत सहभागी होत महिलांसह आबालवृद्धांनी गल्लीत धमाल केली, तर आधुनिक व पारंपरिक संगीतावर नृत्याविष्कारासह, व्यंकटेश स्तोत्र व सतारवादनावर उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कोल्हापुरातील महावीर उद्यान येथे रविवारी सकाळी सात वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून मातृदिनाच्या जागराने ‘लोकमत’ ‘धमाल गल्ली’ची सुरुवात झाली. जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत ‘धमाल गल्ली’त आयोजित विविध उपक्रमांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्यानातील या आल्हाददायक सकाळची सुरुवात व्यासपीठावर वेदा सोनुले व वैदेही जाधव यांच्या व्यंकटेश स्तोत्र पठणाने झाली. स्तोत्राच्या मंगलमय सुरात संपूर्ण उद्यान हरपून गेले. त्यानंतर रस्सीखेच, दोरीउडी, जिबल्या सरकवणे, पोत्यात पाय घालून धावणे, विटी-दांडूसह नृत्याविष्कारात बालचमंूसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गल्लीत लावलेल्या प्रतिक्रिया फलकांवर ‘आई’, ‘स्वप्नपूर्ती’, ‘हॅपी मदर्स डे’, असे संदेश उमटले. महात्मा गांधींच्या वेषात आलेल्या देव सुदर्शन या चिमुकल्याने गांधींजींंच्या विचारसरणींवर आधारित भाषण करून कौतुकाची थाप मिळविली. गल्लीत के. भागर्व, सारंग भोसले व राहुल ढोले यांच्या सतारवादनाने रंगत आली. महावीर उद्यान परिसर हास्यमंचच्या सदस्यांनी निरोगी जीवनाचा मंत्र देत हास्याचे महत्त्व समजावून सांगितले. धमाल गल्लीत प्रेरणा व श्रृती शेटगे या बहिणींनी मायकल जॅक्सनच्या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांना ताल धरायला लावला. समर्थ ठमके या बालकाने शेतकरी गीत सादर केले. पारंपरिक युद्ध प्रात्यक्षिकांसह लाठी-काठी चालविण्याच्या खेळात लहाग्यांचा मोठा सहभाग होता. ७१ वर्षांच्या महादेव चौगले यांनी ‘जाने कहाँ गये वो दिन...’ हे सदाबहार गीत सादर केले. शब्दा सौदलगे, कश्मिरा शहा, पायल माने, आयूब कब्बूर, धनश्री पाटील, श्रृष्टी मोरे व अरुणा मुसळे हिने संमिश्र गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. ‘मल्हार वारी...’ हे गाणे विनायक सासने याने सादर केले. सतीश वडणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व युद्धकलांच्या माध्यमातून उपस्थितांना सुरक्षेचे धडे देण्यात आले. सार्थक क्रिएशन्सच्या पथकाने हिंंदी चित्रपटांतील गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांवर उपस्थित थिरकले. या ‘धमाल गल्ली’चे सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले. (प्रतिनिधी)