शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त गावाकडे परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

संदीप बावचे : लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले ...

संदीप बावचे :

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले आहेत. मात्र, महापुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसा उभारायचा, महापुराने झालेले मोठे नुकसान कसे भरुन निघणार, असे प्रश्न घेऊन पुन्हा संसार उभा करण्यासाठी जड अंत:करणाने पूरग्रस्त गावाकडे येत आहेत.

महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ऊस, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात ५५ गावे असून, यापैकी ४३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. यात २४ गावांचा संपर्क तुटून १३ गावे पाण्याखाली गेली तर ७९ हजार पूरग्रस्तांनी स्थलांतर केले होते.

महापुराचे पाणी शुक्रवार (दि. २३)पासून वाढू लागले तसे चिंचवाडपासून खिद्रापूरपर्यंतच्या गावातील पूरग्रस्त स्थलांतरित होऊ लागले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळीच ग्रामस्थ स्थलातंरित झाले. पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे साठ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला तर ४४ छावण्यांमध्ये १५ हजारहून अधिक पूरग्रस्त वास्तव्याला आले. काहींनी भाड्याची घरेदेखील शोधली. मागील अनुभव पाहता यावेळच्या पुरामध्ये पूरग्रस्तांनी जास्तीत जास्त जनावरे गावाबाहेर काढल्याचे चित्र पाहायला मिळाले. ३० हजारहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. दरम्यान, पूर ओसरत असल्याने पूरग्रस्त गावाकडे परतत आहेत तर काही पूरग्रस्त छावणी व नातेवाईकांकडे वास्तव्याला आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पूरग्रस्तांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.

चौकट.. दु:ख सावरत उभारी

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने मोठे नुकसान केले. त्यातच पुन्हा एकदा महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकवलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दुःखाला पारावरच राहिला नाही. हे दुःख विसरुन नव्या जोमाने सावरण्याचा प्रयत्न पूरग्रस्त करत आहेत.

फोटो ओळ : औरवाड (ता. शिरोळ) येथून नृसिंहवाडीकडे पुराच्या पाण्यातून मार्ग काढत वयोवृध्द आजी-आजोबांनी प्रवास केला. (छाया : सुभाष गुरव)