शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बना : श्रीपाल सबनीस -पलूस येथे २९ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:08 AM

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे,

ठळक मुद्देसाहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे,मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

पलूस येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत शहासने (पुणे) उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नाही, तर जीवनाची उपासना आहे. जीवन बदलून टाकण्यासाठी साहित्य गरजेचे आहे. साहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहासने म्हणाले, ग्रामीण भागात साहित्याची ऊर्जाकेंद्रे आहेत, ती शोधली पाहिजेत. मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची असतात.यावेळी दत्ता मानुगडे, डॉ. अशोक माळी, प्रा. रघुराज मेटकरी, सुनील तोरणे, विजयकुमार कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सर्जेराव नलवडे, आर. पी. सावंत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा. शिवाजी वरूडे व हरिभाऊ पुदाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. संतोष काळे यांनी स्वागत केले, तर वासंती मेरू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी. ए. पाटील, विष्णू सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुहास पुदाले, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, शामराव डाके, वसंत आपटे, सतीश पवार, सोपान डोंगरे, उमा पुदाले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, साहित्यरसिक उपस्थित होते. संतोष काळे व सायली मेरू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संपत पार्लेकर यांनी आभार मानले.कथाकथनाला प्रतिसादसंमेलनाच्या दुसºया सत्रात कथाकथन पार पडले. यावेळी हिम्मत पाटील यांनी ‘माती’ ही विनोदी तितकीच हृदयस्पर्शी कथा सादर करून हास्याचे फवारे आणि अश्रूंच्या धारा यांचा मिलाफ घडवून आणला. त्यानंतर कविसंमेलन पार पडले. कवी धनदत्त बोरगावे अध्यक्षस्थानी होते.पलूस येथील साहित्य संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन केले.