शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विशाल बनगे मृत्यूची फेरचौकशी करा

By admin | Updated: February 26, 2016 01:20 IST

दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण : वडिलांच्या तक्रारीवर न्यायालयाचे पोलिसांना आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर रजपूतवाडी येथे विशाल सुभाष बनगे (वय २४, रा. बुधवार पेठ पोलीस लाईन) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. करवीर पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद स्टेशन डायरीला केली आहे. विशालचा खून केल्याची तक्रार त्याचे वडील सुभाष सायाप्पा बनगे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केल्याने न्यायालयाने फेरचौकशी करण्याचे आदेश करवीर पोलिसांना दिले आहेत. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर दि.३ जुलै २००५ रोजी विशाल बनगे हा मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची नोंद केली. विशालचे वडील गांधीनगर पोलीस ठाण्यात साहाय्यक फौजदार होते. त्यांनी मुलाचा अपघाती मृत्यू नसून प्रेमप्रकरणातून त्याचा खून केल्याची तक्रार केली होती; परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी संशयित आरोपी पोलीस हवालदार राजाराम पाटील, त्यांची पत्नी सुशीला, अतुल पाटील, हरी पाटील, विकास जरग, सखाराम चव्हाण, डॉ. सडोलीकर यांच्या विरोधात दि. ९ जुलै २००५ रोजी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने करवीर पोलिसांना फेरतपासाचे आदेश दिले. गेली दहा वर्षे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांनीही तक्रारदार सुभाष बनगे यांना २ फेब्रुवारी २०१६ रोजी या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे लेखी पत्र दिले आहे. या गुन्ह्यामध्ये नेमका काय तपास झाला, कोणाचे जबाब घेतले, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयास सादर केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)