शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दानशूर बनले ‘त्यांचा’ आनंद

By admin | Updated: November 23, 2014 23:59 IST

कुष्ठधाम रुग्णालय : शेट्ये दाम्पत्य झाले कुष्ठरुग्णांचे गणगोत

कोल्हापूर : घरच्यांनी बाहेर काढले. सरकारने सांभाळण्यात हेळसांड सुरू केल्यामुळे शारीरिक वेदनांबरोबरच आता मनानेही खचत चाललेल्या कुष्ठरोग पीडित बांधवांना समाजातील काही मोजके दानशूर हेच आपला आधार वाटत आहेत. काही दानशूर काम कमी आणि प्रसिद्धी जादा मिळविण्याचा प्रयत्न करतात; पण काहीजण सातत्याने या कुष्ठरोग पीडितांसोबत असतात. त्यांना सर्व प्रकारची मदत करीत असतात. मध्यंतरी एका संघटनेने कुष्ठधाम रुग्णालयातील सर्व रुग्णांना दररोज भोजन देण्याची घोषणा केली; पण चार-सहा दिवसांनंतर हा उपक्रम बंद पडला; मात्र त्यांना प्रसिद्धी भरपूर मिळाली. त्यांचा हेतू (प्रसिद्धीचा) साध्य झाल्यावर पुन्हा कधी त्यांनी या ‘कुष्ठधाम’कडे पाहिले नाही. अधूनमधून काही संघटना असाच प्रयोग करीत असतात; परंतु त्यात प्रामाणिकपणा कमी आणि दिखावा अधिक असतो. मनात एक वेगळी भावना निर्माण झालेली असते; पण काहीच चालत नाही. सारे काही निमूटपणे सहन करावे लागते. शेंडापार्कमधील कुष्ठरोग पीडित बांधवांना नगरसेवक भूपाल शेटे व त्यांच्या पत्नी शशिकला शेटे हे दाम्पत्य मात्र सतत उपयोगी पडत असते. शेटे आणि कुष्ठरोग पीडित बांधव यांचे नाते एवढे घट्ट विनले गेले आहे. ज्यांनी कोणी आपल्या दारात उभे करून घेत नाहीत तेथे शेटे यांच्या घरात थेट किचनपर्यंत सहज प्रवेश मिळतो. घरात येणाऱ्या कुष्ठरोग पीडितांना भोजन, चहा दिला जातो. कोणत्याही अडचणी हक्काने सांगितल्या जातात. शेटे दाम्पत्यही त्या सोडविण्यास मदत करतात. नवे कपडे, चादरी, औषधे सतत देत असतात. या कुष्ठरोग पीडितांबद्दल शनिवारपासून सलग दोन दिवस ‘लोकमत’मध्ये वृत्त छापून आले, तेव्हा त्यांनी शेंडापार्कमध्ये जाऊन विचारपूस केली. त्यांनी सर्व खोल्यांत तातडीने नवीन बल्ब आणून बसविले. डासांपासून संरक्षण करण्यासाठी गूडनाईटची पंधरा कीट खोल्यांतून बसविली. मनपाची यंत्रणा राबवून फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली. कुष्ठरोग पीडितांना तातडीने पायात घालण्यास सॅँडलचे ३६ जोड आणून दिले. त्यांनी ते पायातही घातले. शेटे दाम्पत्य वेळोवेळी या बांधवांना अन्नदान करीत असतात. कोणताही सण असो त्यांना गोडधोड पदार्थ खायला देतात; पण त्याची कोठेही प्रसिद्धी अथवा समारंभ केला नाही. (प्रतिनिधी) विशेष अतिथीचा मान कुष्ठपीडितांना...!कोणत्याही शुभकार्यासाठी बहुतांश लोक मोठ-मोठ्या व नामांकित व्यक्तींना निमंत्रित करुन बडेजाव करतात. मात्र, याला भूपाल शेटे अपवाद ठरले आहेत. दानशूरपणाबद्दल त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सुभाषनगर चौकातील टोलेजंग इमारतीचा पायाभरणी समारंभ शेटे यांनी कुष्ठपीडितांच्या हस्ते नऊ वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात केला होता. शिवाय त्यानंतर याच इमारतीच्या वास्तुशांतीसाठी स्वाधारनगर व कुष्ठधाम रुग्णालयातील कुष्ठपीडितांना विशेष अतिथी म्हणून शेटे यांनी निमंत्रित केले होते.