शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धी नसल्यानेच ‘भुदरगड’चे ठेवीदार अनभिज्ञ

By admin | Updated: December 25, 2014 00:48 IST

पत्रव्यवहारच नाही : प्रसारमाध्यमांवर अवलंबून

कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने ठेवींबाबत थेट ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला नसल्यानेच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. प्रसारमाध्यमांवरच अवसायक मंडळ थांबल्याने बहुतांश ठेवीदार अनभिज्ञ असून, बहुतांश ठेवीदारांच्या रकमा अल्प असल्याने त्यांनी पाठ फिरवली. भुदरगड नागरी पतसंस्था अवसायनात निघाली. लाखापेक्षा अधिक ठेवीदार आणि तेवढीच कर्जदारांची संख्या होती. संस्था अवसायनात निघाल्यानंतर ठेवीदार संघटनेने ठेवी परत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने दहा हजारपर्यंतच्या ठेव परतावा सुरू केला होता. ८१ हजार ठेवीदारांपैकी केवळ १५ हजार ठेवीदारांनी आपले पैसे परत घेतले. गेले चार-पाच वर्षे हेलपाटे मारून पैसे मिळाले नाहीत म्हटल्यावर अनेकांनी पैशाची आशा सोडून दिली आहे. त्यात ठेवीची रक्कम दीड-दोन हजार रुपये असल्याने त्यासाठी कोणाच्या मागे लागायचे? असाही ठेवीदारांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या ठेवी असल्याने अनेकांजवळ पासबुक अथवा ठेवीची पावती नसल्यानेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे जरी खरे असले तरी पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने संबंधित ठेवीदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. केवळ प्रसारमाध्यमातून ठेवीदारांना आवाहन केल्याने अनेक ठेवीदार अनभिज्ञ राहिलेले आहेत. परिणामी, दहा हजार रुपये पर्यंतच्या ठेवींना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी ठेवीदारांच्या पत्यावर पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. तसे केले तर बहुतांश ठेवींचा प्रश्न मार्गी लागू शकतो. ठेवी परत मिळाव्यात म्हणून जनहित याचिका दाखल करून हा प्रश्न मार्गी लावला; पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. जुने ठेवीदार असल्याने काहीजण अशिक्षित आहेत. वृत्तमान पत्रात आलेले त्यांना समजत नाही. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. - दादासाहेब जगताप (जिल्हाध्यक्ष, ठेवीदार संघटना)ठेवीला प्रतिसाद मिळत नाही, हे खरे आहे. दोन हजार रुपयांच्या ठेवींची संख्या जास्त असल्याने ती नेण्यासाठी कोणी येत नाही. अनेक वेळा ठेवीदारांना विविध माध्यमातून आवाहन केले आहे. आता पत्रव्यवहाराच्या माध्यमातून थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. - ए. जी. नाईक(व्यवस्थापक, भुदरगड पतसंस्था)