शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शिवमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

By admin | Updated: February 26, 2017 00:49 IST

आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचा कार्यक्रम : कलागुणांच्या उधळणी; आजही रंगणार सोहळा

कोल्हापूर : ‘इतनी बेचैन होके तुमसे मिली’, ‘बिन तेरे’, या हिंदी चित्रपटांतील सदाबहार गीते सादर करीत संज्योती जगदाळे हिने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झालाच पण नंदेश उमाप यांनी सादर केलेल्या ‘एक शिवाजी राजा’ या गीतावर श्रोत्यांच्या टाळ्या पडल्या, तर एकापाठोपाठ सादर होणाऱ्या मराठी-हिंदी गीतांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली जात होती, निमित्त होते शिवमहोत्सवाचे.शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे विद्यापीठातील लोककला केंद्रात शनिवारी शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मराठी-हिंदी गाण्यांचा आणि कॉमेडीचा ‘यूथफूल तडका’ या कार्यक्रमाने रंगत आणली. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज गरज आहे. शिवाजी महाराज यांचे नियोजन व शिस्त युवकांनी आत्मसात करावी. या महोत्सवातून मनोरंजनासोबतच नवीन कलाकार घडण्यास मदत होत आहे. व्हाईस आॅफ इंडिया फेम संज्योती जगदाळे ‘हा हंसी बन गये हम’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. बहारदार हिंदी गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. पाठोपाठ सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप यांनी मराठी गीते सादर करून सर्वांना डोलण्यास भाग पाडले. त्यांच्या सादरीकरणानंतर महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबीने तर कार्यक्रमास एका वेगळ््याच उंचीवर नेऊन ठेवले. आकर्षक विद्युतरोषणाई, हाऊसफुल्ल सभागृहाने आणि बहारदार गीतांनी शनिवारची सायंकाळ शिवमहोत्सवातील अविस्मरणीय ठरली. याप्रसंगी विद्यीपाठाचे बी.सी.यु.डी. संचालक प्रा. डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, सचिव डॉ. चांगदेव बंडगर, मंजित माने, नितीन पाटील, अ‍ॅड. सचिन आवळे, विश्वास माने, योगेश माने, विशाल कांबळे, डॉ. सरोज बीडकर यांच्यासह विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.