शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची सुंदर प्रतिमा जनमानसात रूजविणार

By admin | Updated: June 28, 2016 00:35 IST

अमोघ गावकर : जिल्ह्याची सुंदरता अबाधित राखण्याचा प्रयत्न करू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुंदरतेप्रमाणे पोलिसांची सुंदर प्रतिमा येथील जनमानसात रूजविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्याचप्रमाणे पोलिसांच्याही काही प्रश्नांची निर्गत लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सकारात्मक विचार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.भारतीय पोलिस सेवेच्या २०११ बॅचच्या अमोघ जीवन गावकर यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक म्हणून झाली. सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते परभणी येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असताना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा हा खुप सुंदर जिल्हा आहे, असे सांगताना गावकर म्हणाले, या सुंदर जिल्ह्याप्रमाणे पोलिसांची सुंदर प्रतिमा माणसांमध्ये दिसली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहू. लोकांमध्ये पोलिस विभागाबद्दल विश्वास व त्यांच्याकडे निर्भयपणे आपल्या आपल्या अन्यायाविरोधात दाद मागता आली पाहिजे. येथील जनता ही शांतताप्रिय आहे. अनेक बाबतीमध्ये जसे शिक्षणात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याची सुंदरता अबाधित राखण्याचा आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर पोलिसांचे काही प्रश्न आहेत. जसे त्यांच्या निवासाची सोय व तत्सम त्याचीही माहिती घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल. जे अधिकारी व कर्मचारी काम करतात. त्यांना निश्चितपणे प्रोत्साहन दिले जाईल. मात्र जे हेतूपुरस्सर काम टाळतील त्यांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील सध्याचे ज्वलंत विषय काय याबाबतही त्यांनी पत्रकारांकडून थोडी माहिती घेतली. येथील अवैध धंदे, पर्यटकांची होणारी लूट, मद्य वाहतूक आदींबाबत त्यांनी चर्चा केली. लवकरच या विषयावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या अनुषंगाने जिल्ह्याचे चेकपोस्ट अधिक सक्षम करणे, अवैध वाहतुकीला आळा घालणे, या गोष्टीवरही लक्ष दिले जाईल. असे ते म्हणाले.सध्या सिंधुदुर्गात मान्सूनमुळे आपत्ती व्यवस्थापन हा एक अग्रमानांकित विषय आहे. काहीही झाले तरी प्रथम पोलिसांना पाचारण केले जाते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त लवकर कशी मदत देऊ शकू याचा आढावाही घेतला जाणार आहे. गजबजणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या वर्ष अखेर पर्यंत जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित केली जातील. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसू शकेल. सिंधुदुर्गात एकूणच गुन्ह्याचे प्रमाण कमी आहे. येथील जनताही शांतताप्रिय आहे. जिल्हा वासियांना या शांतता सुरक्षिततेच्या वातावरणात बाधा येवू दिली जाणार नाही. याची दक्षता आपण घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) अवैध धंद्यांना थारा देणाऱ्यांवर कारवाई करणारजिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्यास अशा धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असे गावकर यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षकपद पुन्हा एकदा कार्यरत झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आबाधित राहील असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.