शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

‘सुंदर’ बाणेरगठ्ठाकडे रवाना

By admin | Updated: June 6, 2014 01:39 IST

अनेकांना अश्रू अनावर : पाचव्या दिवशी मोहिमेला यश

वारणानगर : गेल्या दोन वर्षांपासून बहुचर्चित ठरलेल्या जोतिबा देवस्थानच्या ‘सुंदर’ हत्तीने अखेर आज, गुरुवारी पाचव्या दिवशी वारणानगर सोडले. काही केल्या वाहनात चढायला तयार नसलेल्या सुंदरला कोल्हापूर वनविभागाचे पथक आणि केरळा एलिफंट फेडरेशनच्या टीमने माईल सिडेशन डोस देऊन वाहनात चढविण्यात यश मिळविले. यावेळी आसपासच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुंदरला नेत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कर्नाटकातील बाणेरगठ्ठा राष्ट्रीय उद्यानात उद्या, शुक्रवारी ‘सुंदर’ पोहोचेल. आमदार विनय कोरे यांनी जोतिबाचे प्रतीक म्हणून ‘सुंदर’ हत्ती भेट दिला होता. सुंदर हत्तीचा डोंगरावर छळ केला जात असल्याचा आरोप करीत ‘पेटा’ या संस्थेने सुंदरची जोतिबा डोंगरावरून मुक्तता व्हावी, अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी होऊन सुंदरला तातडीने बाणेरगठ्ठा राष्ट्रीय उद्यानात हलवावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला वारणा उद्योग समूहाचे आमदार विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने कोरे यांची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. १५ जूनपूर्वी ‘सुंदर’ला बाणेरगठ्ठामध्ये हलवावे, असा आदेश दिला होता. कोल्हापूरचा वनविभाग व केरळहून आलेल्या ‘एलिफंट ओनर फेडरेशन’चे तज्ज्ञ २५ जणांचे पथक ३१ मे रोजी वारणा येथे दाखल झाले होते. या पथकाने सुंदरला वाहनामध्ये चढविण्यासाठी सलग दोन दिवस मोहीम राबविली; परंतु सुंदर काही केल्या वाहनात चढायला तयार होत नव्हता. तीन दिवसांपूर्वी तो रात्रीच्या वेळी बिथरल्याने वनविभागाने ही मोहीम थांबविली होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटे पाच वाजल्यापासून सुुंदरला हलविण्यासाठी कोल्हापूरचे वनसंरक्षक विजय शेळके यांच्यासह अधिकार्‍यांनी व ‘केरळा फेडरेशन’च्या टीमने मोहीम सुरू केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुंदरला पाहण्यासाठी आलेल्या नागरिक व सुंदरप्रेमींना मात्र पोलिसांनी अमृतनगर रस्त्यावर थांबविले होते. पोलीस व वनविभागाच्या वाहनांच्या ताफ्यातून ट्रकमधून सुंदरला हलविले. त्यावेळी सुंदरचे लांबूनच दर्शन घेताना अनेक सुंदरप्रेमी नागरिकांना अश्रू अनावर झाले. उद्या, शुक्रवारी रात्री कर्नाटकातील बाणेरगठ्ठा प्राणी संग्रहालयात सुंदर पोहोचेल, असे वनसंरक्षक विजय शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. असे चढविले ट्रकमध्ये सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केरळाचे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिंद्रदेव व डॉ. सुनील यांनी रायफलच्या साहाय्याने सुंदरच्या मागील पायांच्या वरील बाजूस माईल सिडेशन डोस (इंजेक्शन) सोडला. डोसने सुंदरला पाऊणतास शांत केले. त्यानंतर केरळाच्या पथकाने हळूहळू सुंदरच्या चारही पायांना दोरखंड व साखळदंडाने बांधून चालवीत ट्रकमध्ये चढविले. सुंदरचा माहूत हैदर हा रात्रीपासूनच गायब असल्याचे सांगण्यात आले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुंदरला ट्रकमध्ये चढविण्यात या टीमला यश आले. हैदरचे कुटुंबीय गहिवरले ‘सुंदर’चा माहूत हैदर त्याचा भाऊ व कुटुंबीय गेली अनेक वर्षे सुंदरची देखभाल करीत होते. सुंदर जोतिबा तसेच वारणा परिसरात चांगलाच रमला होता; परंतु सुंदरला कर्नाटकात हलविल्याने हैदरचे कुटुंबीय व सुंदरप्रेमी गहिवरून गेले. दिवसभर संपूर्ण वारणा परिसरात ‘सुंदर’चीच चर्चा होती.(प्रतिनिधी)