अधिक माहिती अशी, प्रताप वारके व सात्ताप्पा निकाडे हे दोघेही बांधकाम व्यावसायिक (ठेकेदार) आहेत. निकाडे यांच्याकडून वारके यांनी बांधकाम साहित्य भाड्याने घेतले होते. हे साहित्य व साहित्याचे भाडे देण्यास वारके टाळाटाळ करत होते. साहित्य व भाडे वारंवार मागितल्याचा राग मनात धरून निकाडे हे काही कामानिमित्त पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामधून निघाले असता, प्रताप वारके, संदीप वारके, माधव वारके, योगेश पवार (सर्व राहणार कलनाकवाडी) यांनी चामडी बेल्ट व काठीने पाठीत व मानेवर जबर मारहाण केली. निकाडे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याची तक्रार निकाडे यांनी दिली आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गारगोटी येथे मारहाण; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST