शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘बकरी ईद’ उत्साहात

By admin | Updated: September 26, 2015 00:38 IST

शुक्रवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली़ विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले़ एकमेकांना आलिंगन देत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या़

कोल्हापूर : शहरातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली़ विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले़ एकमेकांना आलिंगन देत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या़ ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी आपले नातेवाईक तसेच मित्रपरिवाराला शिरखुर्म्याची मेजवानी दिली़ सालाबादप्रमाणे दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले़ या ठिकाणी मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी पहिल्या जमातीचे नमाज पठण केले़ दुसऱ्या जमातीसाठी हाफिज आकिब बालेचाँद म्हालदार यांनी, तर तिसऱ्या जमातीसाठी मौलाना राहामतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले़ यावेळी पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सुशांत चव्हाण, बजरंग शेलार, नगरसेवक रमेश पोवार, मंजूर बागवान, समीर काझी, आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ याप्रसंगी कोल्हापूरची व देशाची एकात्मता आणि सुखशांती अबाधित राहावी, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली़याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक मलिक बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, हाजी मुसा पटवेगार, जहाँगीर अत्तार, साजिद खान, रफिक मुल्ला, पापाभाई बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले़ संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आभार मानले़ शहरातील कसाब मस्जिद, अकबर मोहल्ला (बडी मस्जिद) राजेबागस्वार मस्जिद , विक्रमनगर मस्जिद, कब्रस्तान मस्जिद, बाबूजमाल मस्जिद, मणियार मस्जिद, घुडणपीर मस्जिद, सदर बझार, आदी मशिदींमध्येही सकाळी नमाज पठण करण्यात आले़ (प्रतिनिधी) दुष्काळाचे संकट दूर करण्याची प्रार्थना महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम पंचायततर्फे हाजी फ ारूक एम. कुरेशी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी तिरंगा महल सर्वधर्मीयांसाठी ईद-मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मक्का येथील हज दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी आणि विश्वशांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. नमाज पठण करण्यापूर्वी शहरातील विविध मोहल्ल्यांत श्रमदानाने साफसफ ाई करण्यात आली.