शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

‘बेबी शकुंतला’ यांच्या कार्याचा ठसा चिरंतर राहो

By admin | Updated: January 31, 2015 00:25 IST

चंद्रकांत जोशी : पन्नाशीच्या दशकातील ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट प्रदर्शित करून अनोखी श्रद्धांजली

कोल्हापूर : बेबी शकुंतला यांनी गेली पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबर ठेवलेला स्नेह, जिव्हाळा व कर्तृत्वाचा ठसा त्यांच्या निधनानंतरही असाच चिरंतर राहो, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केले. ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी नाडगौंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी भालजी पेंढारकर, सांस्कृतिक केंद्र, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, सिने एक्झिहिबिटर्स असोसिएशन यांच्या वतीने शाहू स्मारकात आज, शुक्रवारी श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. जोशी म्हणाले, बेबीताई यांनी दामलेमामांच्या आग्रहास्तव चित्रपटात प्रवेश केला. त्यांच्यावर ‘प्रभात युग’चा स्नेह, जिव्हाळा व निखळ वृत्ती यांचा प्रभाव होता. त्यांनी १९५४ नंतर चित्रपटात काम करण्याचे बंद केले. मात्र कलाकारांप्रती स्नेह, जिव्हाळा कायम ठेवला. नाडगौंडे कुटुंबीयांतर्फे वर्षा नाडगौंडे यांनी बेबी शकुंतला यांच्या सहवासातील आठवणी जाग्या केल्या. यावेळी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुर्के, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर, चंद्रकांत कारेकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर, हेमसुवर्णा मिरजकर , बेबी शकुंतला याचे चिरंजीव सुरेश नाडगौंडे, मुलगी तेजस्विनी भोसले, नातू कौस्तुभ, केदार, नात रितीका, अमृता , प्रणाली, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आठवणींना उजाळा...पन्नाशीच्या दशकात तयार झालेल्या व अनंत माने प्रमुख निर्मित ‘चिमणी पाखर’ हा कृष्णधवल मराठी चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटातील बेबी शकुंतला यांची ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या मुलीची व्यक्तीरेखा सर्वांना आजही भावून जाणारी होती. उपस्थितांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.